सिद्धार्थ शुक्ला-शेहनाज गिलचा नवीन म्यूझिक व्हिडिओ होणार लवकरच रिलीज; फोटो पाहून चाहते भावुक

मुंबई। लोकप्रिय शो ‘बिग बॉस’मध्ये झळकलेला छोट्या पडद्यावरील अभिनेता सिद्धार्थ शुक्ला व अभिनेत्री शेहनाज गिल या दोघांचा नवीन म्यूझिक व्हिडिओ लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. मात्र सिद्धार्थ शुक्लाच्या अचानक निधनानंतर कुटुंब व चाहत्यांवर दुख:चा डोंगर कोसळला आहे.

त्यामुळे या नवीन म्यूझिक व्हिडिओच्या शूटिंग दरम्यानचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे जो पाहून चाहते प्रचंड भावुक झाले आहेत. आता चाहत्यांना या नवीन गाण्याची ओढ लागली असून हा व्हिडिओ लवकर रिलीज करा अशी चाहत्यांकडून मागणी केली जात आहे.

सिद्धार्थ आणि शेहनाजने काही दिवसांपूर्वीच एका म्युजिक व्हिडीओ मध्ये एकत्र काम केल आहे. तो सॉंग लवकरच रिलीज केला जाणार आहे. इन्स्टाग्रामवर सिद्धार्थ आणि शेहनाजची काही फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

हा फोटो त्यांच्या या शेवटच्या म्युजिक व्हिडीओच्या शूटिंगचा आहे. हा BTS फोटो असून सर्वच फोटो पाहून भावुक झाले आहेत. यामध्ये सिडनाज अर्थातच सिद्धार्थ आणि शेहनाज बिचवर दिसून येत आहेत. या सॉंगचं नाव ‘हॅबिट’ असं आहे. हे गाणं श्रेया घोषालचं आहे.

एका फोटाग्राफरने आपल्या इन्स्टाग्राम वर हे फोटो शेयर केले आहेत. या दोघांची लव्हस्टोरी चाहत्यांना प्रचंड आवडते. हे दोघे डिसेंबरमध्ये लग्न करणार असल्याचं देखील म्हटलं जात होत. मात्र सिद्धार्थच्या अचानक जाण्यानं सर्वांनाच मोठा धक्का बसला. या फोटोवर आता चाहत्यांच्या अनेक भावुक कमेंट्स येत आहेत.

काहींनी लिहिलंय की, ‘प्लिज गाणं लवकर रिलीज करा प्रतीक्षा नाही होत आता’ तर काहीजण म्हणतायत ‘गाणं जितकं शूट झालं आहे तितकंच रिलीज करा. आम्हाला एकदा सिद्धार्थ आणि शेहनाज ला पुन्हा एकत्र पाहायचं आहे’. त्यामुळे आता सिद्धार्थ आणि शेहनाज पुन्हा एकत्र झळकणार असून सिद्धार्थच्या जाण्यानं सर्वच हळहळ व्यक्त करत आहे.

हे दोघे ज्यावेळी बिग बॉसमध्ये होते त्यावेळी यांची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडत होती. यावेळी त्यांच्यामध्ये जवळीकता निर्माण झाली होती. मात्र सिद्धार्थच्या अशा अचानक मृत्यूने शेहनाजची अवस्था प्रचंड बिकट असल्याचे म्हटले जात आहे.
महत्वाच्या बातम्या
साऊथचे ‘हे’ कलाकार आहेत 100 कोटी क्लबचे राजे; माहित नसेल तर जाणून घ्या साऊथचा सलमान खान? 
आईशपथ! ‘तारक मेहता…’ फेम बबिताजी करतेय 9 वर्ष लहान अभिनेत्याला डेट, नाव ऐकून बसेल धक्का
सगळा रस्ता कंडोंमने भरलाय! हायवेर कंडोमचा खच पाहूण उडाली खळबळ
बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीचा पराभव शिवसेनेमुळे झाला असं लोकं का म्हणतात? वाचा..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.