सिध्दार्थ चांदेकर आणि मिताली मयेकरचे रोमांस करतानाचे फोटो झाले व्हायरल, पाहा फोटो

अभिनेता सिध्दार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर लग्नबंधनात अडकले आहेत. सिध्दार्थ आणि मिताली गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या लग्नामूळे चर्चेत होते. पुण्यामध्ये २४ जानेवारी रोजी पारंपारिक मराठी पद्धतीने दोघांचे लग्न पार पडले आहे.

सिध्दार्थ आणि मिताली गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. २०१९ मध्ये दोघांचा साखरपुडा झाला होता. पण कोरोनामूळे लग्न पुढे ढकलण्यात आले होते. पण नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच दोघांचा लग्न समारंभ पार पडला आहे.

लग्न समारंभातील व्हिडिओ, फोटो तुफान व्हायरल होत आहेत. त्यांच्या फॅन्सनी त्यांच्या फोटो, व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

लग्नानंतर या मराठमोळ्या जोडीने हनीमुनसाठी पुण्याजवळील लोणावळा हे ठिकान निवडले आहे. लोणावळ्यातील ‘मचान रिसॉर्टवर’ दोघे थांबले असल्याचे फोटो दोघांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.

सिध्दार्थ आणि मितालीने किस करतानाचा फोटो शेअर केला आहे. तसेच मितालीने बाथटबमधील फोटो शेअर करत चाहत्यांना घायाळ केले आहे. त्यांच्या या फोटीची चर्चा सध्या सोशल मिडियावर होत आहे. दोघांचे रोमॅंन्टिक फोटो सोशल मिडियावर धूमाकूळ घालत आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.