“अशी ही बनवाबनवी म्हणजे माझ्यासाठी शाळा आहे आणि यातले सर्व शिक्षक मातब्बर”

२३ सप्टेंबर १९८८ रोजी मराठी सिनेसृष्टीच्या इतिहासात एक सोनेरी पान जोडले गेले होते. याच दिवशी राज्यात सर्वत्र ‘अशी ही बनवाबनवी’ हा सिनेमा प्रदर्शित झाला. याला ३३ वर्ष पूर्ण झाली. एवढी वर्ष उलटली तरी या सिनेमाची जादू आजही कमी झालेली दिसत नाही.

अभिनेता अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगांवरकर, सुप्रिया पिळगांवकर, निवेदिता सराफ, प्रिया बेर्डे असे तगडे कलाकार या चित्रपटात दिसून आले होते. त्याकाळी हा चित्रपट तुफान गाजला होता. या चित्रपटाला मराठी चित्रपटांमधला मास्टरपिस म्हणून ओळखले जाते.

हा सिनेमा सचिन पिळगांवकर यांनी दिग्दर्शित केला होता. या सिनेमातील अनेक डायलॉग आजही लोकांना पोटभरुन हसवतात. आता या सिनेमाला ३३ वर्षे पुर्ण झाल्यानिमित्त अभिनेता सिद्धार्थ जाधवने यासंबंधी एक पोस्ट शेअर केली आहे.

हा सिनेमा म्हणजे माझ्यासाठी शाळा आहे आणि यातील मातब्बर शिक्षक इतके महान शिक्षक की या आपण काही बोलणं म्हणजे लव्ह यु ऑल, अशी पोस्ट सिद्धार्थ जाधवने शेअर केली आहे. सिद्धार्थ जाधवची पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.

काही तासांमध्येच पोस्टला हजारो लोकांनी लाईक केले आहे. तसेच या फोटोवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहे. अनेकांनी या सिनेमाला आठवणीतील सिनेमा म्हटले आहे, तर काहींनी असा सिनेमा होणे, आजच्या काळात शक्य नाही, असे म्हटले आहे.

अशावेळी अनेकांनी अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे आणि सचिन पिळगांवकर यांचे मनभरुन कौतूक केले आहे. मराठी चित्रपट सृष्टीचा खरा सुवर्ण काळ म्हणजे हे त्रिकुट… सचिन पिळगांवकर सर, अशोक सराफ सर आणि ह्या सगळ्यात अफलातून म्हणजे आपले लाडके लक्ष्मीकांत बेर्डे सर, असे एका फेसबूक युजरने म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

विराटच्या कर्णधारपदाचा राजीनामा देण्यामागे होता ‘हा’ व्यक्ती, वनडेचं कर्णधारपद सोडण्याचीही केली होती मागणी
खुल्लमखुल्ला प्यार करेंगे हम दोनो! सायली कांबळेने दिली प्रेमाची कबुली ‘या’ व्यक्तीला करतेय डेट
दुपारी ३ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत शेतात काम करू नका; सरकारचे शेतकऱ्यांना आवाहन

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.