मराठी कलाकार पैसेच नाही तर रक्त पण देताय, त्यांना ट्रोल करु नका; सिद्धार्थ जाधवची चाहत्यांना विनंती

राज्यभरात कोरोनाच्या संकटाने थैमान घातले आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे रुग्णालयात ऑक्सिजन, बेड्स, औषधांचा तुडवडा निर्माण झाला आहे.

अशा परिस्थिती अनेक कलाकार लोकांच्या मदतीला धावून येत आहे. मराठी कलाकारही कोरोना रुग्णांची मदत करत आहे. आता जाहिरातबाजी न करता मदत करणाऱ्या या कलाकारांना कृपया ट्रोल करु नका, अशी विनंती अभिनेता सिद्धार्थ जाधवने केली आहे.

मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार कोरोनाच्या लढ्यात शक्य तेवढी मदत करत आहे. प्रवीण तरडे, संदीप पाठक, प्रिया बेर्डे, तेजस्विनी पंडीत, यांच्यासारखे कलाकार गावोगावी जाऊन मदत करत आहे, असे सिद्धार्थ जाधवने मटाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

अनेक मराठी कलाकार रक्तापासून अन्न धान्यापर्यंत सर्व प्रकारची मदत करत आहे. परंतू तरी देखील लोक हिंदी कलाकारांचेच कौतूक करत आहे. अर्थात आम्ही याबाबत कुठलीही जाहिरातबाजी करत नाहीये, पण मराठी कलाकार काहीच करत नाहीये, अशी तक्रार करु नका. त्यांच्या मदतीवर शंका उपस्थित करु नका, अशी विनंती सिद्धार्थने यावेळी केली आहे.

तसेच गेल्या काही दिवसांमध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक तरुणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. सुमित्रा भावे, अभिलाषा पाटील, किशोर नांदलस्कर अशा जेष्ठ कलाकारांना आपण कोरोनामुळे गमावले आहे. याचे खुप वाईट वाटते, असेही सिद्धार्थ जाधवने म्हटले आहे.

दरम्यान, राज्यभरात आता झपाट्याने वाढणारी रुग्णांची संख्या आता कमी होताना दिसत आहे. तसेच रिकव्हरी रेटही वाढलेला दिसून येत आहे. गुरुवारी ५४,५३६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर शुक्रवारी कोरोनाबाधितांच्या संख्येत अजून घट होताना दिसत आहे. आजही ५३,२४९ कोरोना रुग्ण बरे झाले आहे.

महत्वाच्या बातम्या-

मांजर पिल्लांना घेऊन का जात नाही; चिमुकलीची पिल्लांसाठी तळमळ पाहून तुम्हीही हळवे व्हाल; पहा व्हिडीओ
ही दोस्ती तुटायची न्हाय! दोन मित्रांनी आपल्या कोरोनाग्रस्त मित्रासाठी जे केलं ते पाहून सलाम ठोकाल
आता पेट्रोलच टेन्शन मिटलं, ही गाडी एकदा चार्जिंग केली की १५० किलोमीटर धावतेय, जाणून घ्या..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.