मालिकेत भोळी दिसणारी ‘अंगूरी भाभी’ खऱ्या आयुष्यात आहे खूपच हॉट आणि ग्लॅमरस, पाहा फोटो

‘भाभी जी घर पर है’ ही लोकप्रिय टेलिव्हिजन मालिका आहे. या मालिकेतून अंगूरी भाभी म्हणजेच शुभांगी अत्रे घरा-घरात पोहचली आहे. अभिनयासोबत चाहते तिच्या लुक्सवर फिदा आहेत. नुकतेच शुभांगीने सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. मालिकेतील अंगूरी भाभीचे खऱ्या आयुष्यातील फोटो व्हिडीओ पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

 

मालिकेत भाभीची भुमिका साकारणाऱ्या शुभांगी अत्रेने स्टायलिश फोटो शेअर केले. चाहत्यांमध्ये या फोटोंची चर्चा आहे. व्हिडीओतील शुभांगीची आदा पाहून चाहते दिवाने झाले आहेत. तिचा रीअल लाइफमधील बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाज पाहून तुम्हीही थक्क व्हाल. तसेच गेल्या वर्षी अशाच एका लूकमुळे तिला ट्रोल करण्यात आले होते.

 

भाभी जी घर पर है या मालिकेत शुभांगी अत्रे अंगुरी भाभीची भुमिका साकारताना भोजपुरी बोली आणि रंगीबेरंगी कपड्यांसह उत्कृष्ट अभिनय करत आहे. तर सुरुवातीपासूनच ती या मालिकेत नव्हती. तिच्याआधी शिल्पा शिंदे या शोमध्ये अंगुरी भाभीची भूमिका साकारत होती. मीडिया रिपोर्टनुसार शोच्या निर्मात्यांनी शिल्पाच्या जागी अंगूरी भाभी ही भूमिका शुभांगीला दिली.

 

दरम्यान, शुभांगी अत्रेने करीअरची सुरुवात एकता कपूरचा टीव्ही शो ‘कसौटी जिंदगी की’ मधून केली होती. परंतु ‘कस्तुरी’मध्ये साकारलेल्या मुख्य भूमिकेनंतर तिला ओळख मिळाली. यानंतर शुभांगीला ‘भाभी जी घर पर है’ मधील अंगूरी भाभीच्या व्यक्तिरेखेतील कारकीर्दीला नवी उंची मिळाली आहे.

 

 

महत्वाच्या बातम्या-
रतन टाटा आहेत ‘या’ गाड्यांचे शौकीन, बघा त्यांचे कार कलेक्शन
अभिमानास्पद! गवंड्याची मुलगी झाली केंद्रीय पोलिस दलामध्ये भरती, आई-वडीलांचे पाणावले डोळे
..म्हणून टोल भरल्यानंतर पावती जपून ठेवा, वाचा टोल पावतीचे आश्चर्यकारक फायदे
अजित पवारांनी सेलिब्रिटींना ‘या’ भाषेत झाप झाप झापले; ‘तेव्हा तुम्हाला कुणी…’

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.