मराठी मालिका आणि चित्रपट आत्ता चांगलेच प्रसिद्ध होत आहेत. प्रसिद्धिच्याबाबतीत ते हिंदी मालिकांना मागे टाकत आहेत. अशा अनेक मालिका सध्या सुरु आहेत. मराठी टेलिव्हिजनवर आत्ता वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत.
फक्त कौटूंबिकच नाही तर समाजिक, विनोदी, स्सपेन्स, हॉरर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मालिका सुरु आहेत. यात एका नवीन मालिकेची भर पडली आहे. या मालिकेचे नाव आहे ‘काय घडलं त्या रात्री’ काही दिवसांपूर्वीच झी मराठीवर ही नवीन मालिका सुरु झाली आहे.
या मालिकेच्या पहील्या प्रोमोपासूनच प्रेक्षकांच्या मनात या मालिकेबद्दल उत्सूकता निर्माण झाली आहे. हि मालिका थ्रीलर आहे. म्हणून प्रेक्षकांना जास्त रुची निर्माण झाली आहे. मालिकेत अनेक कलाकार काम करत आहेत. मुख्य भुमिका अभिनेता गौरव घाटणेकर साकारत आहे.
गौरवने या अगोदरही अनेक मालिका आणि चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्याच्या उत्तम आणि प्रभावशाली अभिनयासाठी त्याला ओळखले जाते. त्याच्या अभिनयासाठी त्याला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
गौरवने व्हिसलिंग वुड्स या संस्थतेतून अभिनयाचे धडे घेतले आहेत. तिथे त्याला ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाहाच्या हाताखाली अभिनय शिकता आला. त्यानंतर त्याने नाटकांपासून त्याच्या अभिनय क्षेत्रातील प्रवासाची सुरुवात केली.
त्यानंतर त्याने ‘तुझविण सख्या रे’ मालिकेतून अभिनय टेलिव्हिजनवर डेब्यू केला. हि मालिका लोकप्रिय झाली. लोकांना गौरवचा अभिनय खुपच आवडला. त्याच्या अभिनयाचे कौतूक करण्यात आले. या मालिकेनंतर त्याला अनेक संधी भेटत गेल्या.
त्याने हिंदी टेलिव्हिजनवर देखील काम केले. त्यासोबतच तो शॉर्टफिल्मस, वेबसीरीज आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्याने तुझी माझी लव्ह स्टोरी, काय रे रास्कल, वजनदार, राधेमुरारी अशा चित्रपटांमध्ये काम केले.
त्याच्या या सगळ्या प्रवासात त्याची पत्नी खंभीरपणे त्याच्या पाठीशी उभी होती. पत्नीमूळेच तो एवढा पुढे शकला. गौरवची पत्नी देखील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिचे नाव श्रुती मराठे आहे. दोघांचे लव्ह मॅरेज झाले आहे.
एका मालिकेच्या शुटींगवेळी दोघांची भेट झाली होती. या भेटीचे रुपांतर प्रेमात झाले आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघांच्या जोडीला प्रेक्षक देखील खुप पसंत करतात. हे दोघेही एकत्र खुप आनंदी आहेत. त्यासोबतच दोघे त्यांच्या करिअरवर लक्ष देत आहेत.
महत्वाच्या बातम्या –
‘सोनपरी’ फेम मृणाल कुलकर्णी आज जगत आहेत ‘असे’ आयुष्य; वाचून धक्का बसेल
कपिल शर्मा संपत्तीच्या बाबतीत बॉलीवूड कलाकारांना टाकतो मागे; जाणून घ्या एकूण आकडा
उर्वशी रौतेला ठरली बॉलीवूडची सर्वात महागडी अभिनेत्री; फक्त पंधरा मिनिटांसाठी घेते ‘एवढे’ करोड
‘कुमकुम भाग्य’ मालिकेतील सरला माँची मुलगी आहे प्रसिद्ध अभिनेत्री; फोटो पाहून विश्वास बसणार नाही