अभिनेते जॅकी श्रॉफला घरकाम करणाऱ्या तरूणीच्या आजीचं निधन झाल्याचं समजलं अन्…

पुणे | माणसाने कितीही मोठं झालं तरी आपला साधेपणा विसरू नये असं बोललं जात. कलाकार, राजकीय नेते, उद्योजक अनेकदा जनतेशी मिसळून त्यांना आधार देण्याचे काम करतात. आपल्या मनात घर करणाऱ्यांच्या मदतीला तर मोठमोठ्या व्यक्ती नेहमीचं धावून जातात. याचाच प्रत्यय पुण्यातील एका कुटूंबाला आला आहे.

पुण्यातील मावळ तालूक्यातील दिपाली तुपे या प्रसिध्द अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्या बंगल्यामध्ये घरकाम करण्याचे काम करतात. अनेक दिवसांपासून जॅकी श्रॉफ यांच्याकडे इमानदारीने काम करत असल्याने त्यांचे आणि जॅकी यांचे चांगले संबंध आहेत.

दिपाली यांच्या आजी तान्हाबाई ठाकर यांचे वयाच्या शंभराव्या वर्षी निधन झाले होते. त्यामूळे संपुर्ण तुपे कूटूंबीय शोकसागरात बुडालं होतं. आपल्या बंगल्याची काळजी घेणाऱ्या तरूणीच्या आजीचे निधन झाले आहे हे जॅकी श्रॉफ यांना समजताच त्यांनी मावळ तालूक्यातील कडधे गावात जाऊन दिपाली यांच्या कूटूंबाला धीर दिला आहे.

अभिनेते जॅकी श्रॉफ यांचा मावळमध्ये आलिशान फार्महाऊस आहे. कामातून वेळ काढून ते मावळातील चांदखेड गावात फार्महाऊसवर येत असतात. त्यात फार्महाऊसवर दिपाली या काम करत आहेत. जॅकी श्रॉफ सांत्वनाला धावून आले. त्यावेळी त्यांनी माणूसकीचं दर्शन घडवले. त्यांचे अनेकजणांनी कौतूक केले आहे.

अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी हाऊसफुल ३, धूम ३, भूत अंकल, बदमाश, बॉर्डर, राम लखन, सिर्फ तुम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये उत्कृष्ट भूमिका निभावल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या-
सावधान! मासे तुमच्या पोटात घालतात प्लास्टिक, अहवालातून झाला ‘हा’ धक्कादायक खुलासा 
श्रीलंकन ब्यूटी जॅकलीन फर्नांडिसचा हॉट अंदाज; शेअर केला टॉपसेल फोटो
विजय हजारे ट्रॉफीच्या फायनलमध्ये पृथ्वी शॉचा झंझावात; ३९ चेंडूत ठोकल्या ७३ धावा
जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या दाऊद इब्राहीमला आमिर खानने ‘असा’ दिला होता चकवा

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.