रुग्णांच्या मदतीला मंत्र्यांची मुलं सरसावली; कोणी मारतंय झाडू, तर कोणी उचलतंय गाद्या

राज्यभरात कोरोनाची दुसरी लाट उसळली आहे. रुग्णांची संख्या झपाट्याने वाढ आहे. असे असले तरी राज्यात सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपण सुरु आहे.

अशा परिस्थितीत आता मंत्र्यांची मुले ही चर्चेचा विषय ठरली आहे. महाराष्ट्राचे राज्यमंत्री आणि सोलापुरचे दत्तात्रय भरणे यांचे चिरंजीव सध्या कोरोना काळात कोविड सेंटरमध्ये मदत करताना दिसत आहे.

दत्तात्रय भरणे यांच्या चिरंजीवाचे नाव श्रीराज भरणे आहे. इंदापूर इथल्या व्हि.पी कॉलेजमध्ये १०० बेडचे कोविड रुग्णालय उघडण्यात आले आहे. त्यावेळी श्रीराज भरणे स्वत: त्या गाद्या उचलून ठेवताना दिसत आहे.

राज्यातील परिस्थिती पाहता काम करणे गरजेचे आहे. अशात श्रीराज यांना कोविड सेंटरमध्ये गाद्या उचलताना पाहू आजूबाजूला उभ्या असलेल्या प्रतिष्ठित मंडळींना पण पुढाकार घ्यावा लागला आहे.

दुसरीकडे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील या पुणे जिल्हा परीषदेच्या सदस्या आहेत. इंदापूर तालूक्यातील बावडा ग्रामीण रुग्णालयाच्या उद्घाटनावेळी आल्या होत्या. त्यावेळी त्यांना आजूबाजूच्या परिसरात अस्वच्छता दिसून आली. त्यावेळी त्यांनी स्वत: झाडू घेऊन तो परीसर स्वच्छ केला आहे.

सध्या सोलपुर जिल्ह्यात श्रीराज भरणे आणि अंकिता पाटील यांचीच सर्वत्र चर्चा सुरु आहे. सध्या राज्यात सत्ताधारी आणि विरोधी पक्ष एकमेकांवर टीका करत आहे. पण हे दोघेही कोणावर टीका न करता जनतेच्या सेवेत असल्याने सगळीकडे यांचे कौतूक होत आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘मोदींनी देशाची तर वाट लावली, पण जनतेलाही मरण्यासाठी सोडून दिले आहे; अभिनेत्याची जहरी टिका
देशात कोरोनाचा हाहाकार! एकाच दिवसात भाजप आणि काँग्रेसच्या ३ आमदारांचा मृत्यू
गुरमीत चौधरी आणि डेबिनाचे घर आहे खुपच आलिशान आणि सुंदर; पहा फोटो

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.