Share

‘ब्राह्मणांनी समर्थ रामदास व दादोजी कोंडदेवांना शिवाजी महाराजांच्या गुरूपदी लादले’

ब्राह्मण आणि ब्राह्मणेत्तरांमधील जातीयवादी विद्वानांच्या मुठीतून छत्रपती शिवाजी महाराजांची सुटका व्हावी, असे परखड मत अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस(Shripal Sabanis) यांनी मांडले आहे. ‘छत्रपती शिवराय: ब्राह्मण-ब्राह्मणेत्तर वाद आणि विवेकवादी भूमिका’ या पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशन कार्यक्रमात डॉ. श्रीपाल सबनीस यांनी हे वक्तव्य केलं आहे.(shripal sabnis statement on the controversy of chatrpati shivaji maharaj history)

नागपूरमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात डॉ. श्रीपाल सबनीस यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावरून सुरु असलेल्या वादावर भाष्य केले. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे स्वराज्य जाती-धर्मापलीकडचे आहे, असे मत डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केलं आहे.

या कार्यक्रमात डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले की, “ब्राह्मणांमधील काही विद्वानांनी समर्थ रामदास व दादोजी कोंडदेव यांना महाराजांच्या गुरुपदी लादले. तर महाराजांचे शत्रू मुसलमान असल्याचा भास निर्माण करताना अफजलखानाच्या वधाचे उदाहरण दिले. पण अफजलखानाचा वध महाराजांनी स्वराज्याचे शत्रू म्हणून केला, हे या विद्वानांना ठाऊक नाही”, असे डॉ. श्रीपाल सबनीस यांनी सांगितले.

डॉ. श्रीपाल सबनीस पुढे म्हणाले की, “तर दुसरीकडे ब्राह्मणेत्तर विद्वानांनी महाराजांचे शत्रू ब्राह्मण असल्याचा भास निर्माण करताना कृष्णाजी कुळकर्णी यांना महाराजांनी ठार केल्याचे उदाहरण दिले. पण कृष्णाजी कुळकर्णी यांनाही स्वराज्याचे शत्रू म्हणून महाराजांनी मारले हे ब्राह्मणेत्तर विद्वानांना ठाऊक नाही का? असा सवाल डॉ. श्रीपाल सबनीस यांनी उपस्थित केला आहे.

“महाराजांना हे हिंदुत्ववादी म्हणवण्याचा जसा घाट घातला जात आहे, तसंच फुले, शाहू, आंबेडकरवादी असल्याचे सांगून त्यांची विभागणी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यातून महाराजांच्या कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रयत्न ब्राह्मण आणि ब्राह्मणेत्तर व दलित समाजातील काही विद्वानांकडून केला जात आहे. या जातीयवादी विद्वानांच्या मुठीतून छत्रपती शिवाजी महाराजांची सुटका व्हावी”, असे देखील डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले आहेत.

यावेळी डॉ. श्रीपाल सबनीस यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर देखील भाष्य केलं. “बाबासाहेब पुरंदरे यांचा इतिहासाचा अभ्यास मला आदरणीय आहे. त्यांनी शिवाजी महाराज घरादारात पोहचवले, हेही मला मान्य आहे. पण त्यांच्या इतिहासातील शिवाजी ब्राह्मणांकडे झुकलेला आहे. तर ब्राह्मणेत्तर शरद पाटलांनी देखील शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा विनयभंग केला आहे”, असे डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या :-
सगळ्यात जास्त कमाई करणारा चित्रपट बनला KGF 2, सलमानलाही बसला ‘हा’ मोठा झटका
तीन तारखा, तीन ठिकाणं, मनसेचा मास्टर प्लॅन ठरला..; राज ठाकरेंच्या बैठकीत मोठा निर्णय
उमरान आणि बुमराह मिळून इंग्रजांची बॅंड वाजवतील, काश्मिरी मुलाने जिंकले शशी थरूर यांचे मन

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now