स्वत:च्याच मैत्रीणीच्या नवऱ्याच्या प्रेमात पडल्या होत्या श्रीदेवी; मैत्रीणीचा संसार मोडला होता

बोनी कपूर आणि श्रीदेवीची लव्ह स्टोरी फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात चर्चित लव्ह स्टोरीपैकी एक आहे. दोघांनी एकमेकांसाठी अनेक अडचणींचा सामना केला होता. विवाहीत बोनी कपूरच्या प्रेमात पडून श्रीदेवी लग्नाच्या अगोदरच गरोदर राहिल्या होत्या. ज्यामूळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता.

श्रीदेवीमूळे बोनी कपूरचे त्यांच्या पहील्या पत्नीसोबतचे संबंध खराब झाले होते. श्रीदेवीमूळे बोनी कपूरने त्यांची पत्नी मोना आणि लहान मुलांना सोडले होते. ही गोष्ट सगळीकडे वाऱ्यासारखी पसरली होती. श्रीदेवीला होम ब्रेकर बोलले जाऊ लागले होते.

श्रीदेवीमूळे बोनी कपूरने पहील्या पत्नीला घटस्फोट दिला होता. त्यानंतर दोघींचे नाते खुपच खराब झाले होते. पण खुप कमी लोकांना माहीती असेल की, श्रीदेवी बोनी कूपरसोबत मैत्री करण्याअगोदरपासून मोना कपूरच्या चांगल्या मैत्रीण होत्या.

दोघींच्या मैत्रीबद्दल इंडस्ट्रीतील खुप कमी लोकांना माहीती आहे. श्रीदेवीच्या आणि बोनीच्या अफेअरमूळे मोनाला खुप मोठा धक्का बसला होता. एका मुलाखतीमध्ये मोना कपूरने या धोक्याचा खुलासा केला होता. त्यांनी सांगितले होते की, पती आणि मैत्रीणीच्या या धोक्यामूळे त्यांना आतमध्ये पुर्णपणे तोडून टाकले होते.

पण त्यावेळी मोना कूपर काहीही करु शकत नव्हत्या. कारण श्रीदेवी तोपर्यंत गरोदर होत्या. बोनी कूपरसोबत मैत्री करण्याअगोदर श्रीदेवी मोना कपूरच्या चांगल्या मैत्रीण होत्या. अनेकदा मोनाला भेटण्यासाठी श्रीदेवी त्यांच्या घरी जायच्या.

त्यावेळी श्रीदेवी मिथून चक्रवर्तीला डेट करत होत्या. रिलेशनशिपमधील अनेक अडचणी त्या मोनाला सांगायच्या आणि दोघी अनेक वेळ गप्पा मारत बसायच्या. पण श्रीदेवीचे आपल्या पतीसोबत अफेअर बघून मोना कपूर पुर्णपणे तुटल्या होत्या.

१९९६ मध्ये त्यांनी बोनी कपूरसोबत लग्न केले. श्रीदेवीसाठी बोनीने त्यांच्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला होता. ही गोष्ट बोनीच्या घरच्यांना आवडली नव्हती. म्हणून श्रीदेवीला होम ब्रेकर बोलले जात होते. श्रीदेवीच्या बहिणीला देखील त्यांचे हे लग्न मान्य नव्हते.

मोना कपूरच्या आईला देखील हे नातं मान्य नव्हते. असे बोलले जाते की, मोनाच्या आईने श्रीदेवीवर हात उचलला होता. त्यावेळी श्रीदेवी गरोदर होत्या. या घटनेनंतर श्रीदेवीने बोनी कपूरला त्यांची पहीली पत्नी आणि मुलांपासून पुर्णपणे दुर गेले होते. याच कारणामूळे श्रीदेवी जिवंत असेपर्यंत अर्जून कपूर आणि बोनी कपूरचे नाते नीट होऊ शकले नाही.

लग्नानंतर श्रीदेवी बोनी कपूरच्या घरी जाऊ शकल्या नाहीत. कारण बोनीच्या पहिल्या पत्नी मोनाने ते घर सोडले नव्हते. त्यांची दोन्ही मुलं लहान होती. त्यांच्यावर या गोष्टीचा परिणाम होऊ नये. म्हणून त्यांनी घटस्फोटानतंरही बोनीचे घर सोडले नव्हते.

लग्नानंतर दहा वर्षे श्रीदेवी बोनी कपूरच्या घरी गेल्या नाहीत. त्या दुसरिकडे राहत होत्या. बोनी कपूरचा पहिला मुलगा अर्जुन कपूर श्रीदेवीसोबत कधीही बोलत नव्हता. कारण त्याच्या मते श्रीदेवी त्याच्या आईच्या गुन्हेगार आहेत.

श्रीदेवीमूळे अर्जुन कपूर त्याच्या वडिलांपासून लांब गेला होता. ही गोष्ट त्याला मान्य नव्हती. तो कधीही श्रीदेवीसोबत बोलत नव्हता. श्रीदेवी आणि बोनी कपूरला जान्हवी आणि खुशी दोन मुली झाल्या. २२ वर्ष श्रीदेवीने बोनी कपूरसोबत संसार केला.

महत्वाच्या बातम्या –
अमेरिकन टॉम अल्टरचा जन्म झाला होता भारतात; चित्रपटांमध्ये विदेशी खलनायक बनून अभिनेत्यांना दिला त्रास
बॉलीवूडच्या पार्टीमध्ये जाताना स्वत:ची खास दारु सोबत घेऊन जायचे शो मॅन राज कपूर
सनी देओलवर भयंकर चिडले होते चंकी पांडे; न बोलता सेटवरुन गेले होते निघून
करिश्मा कपूरचा चित्रपट पाहील्यामूळे तिच्या चाहत्याला मिळाली होती शिक्षा; रात्रभर बाहेर झोपावे लागले

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.