संजय दत्तला ‘त्या’ अवस्थेत बघून श्रीदेवीने त्याला धक्के मारून सेटवरुन हाकलून दिले होते

बॉलीवूड कलाकारांचे जगभरात लाखो करोडो चाहते आहेत. म्हणून बॉलीवूड जगभर खुप प्रसिद्ध आहेत. अनेक वेळा आपल्या आवडत्या कलाकाराला भेटण्यासाठी फॅन्स अनेक गोष्टी करत असतात. आपता आवडता कलाकार काय करतो. हे जाणून घेण्याची उत्सूकता सर्वांना असते.

पण आज आम्ही तुम्हाला एका अशा फॅनबद्दल सांगणार आहोत जो स्वतः एक बॉलीवूडचा अभिनेता आहे. हा अभिनेता आहे बॉलीवूडचा संजू बाबा म्हणजेच संजय दत्त. संजय दत्त अभिनेत्री श्रीदेवी यांचा खुप मोठा चाहता आहे.

८० च्या दशकात बॉलीवूडमध्ये श्रीदेवी त्यांच्या करिअरच्या टॉपवर होत्या. बॉलीवूडमध्ये येण्याअगोदर श्रीदेवी साऊथमध्ये टॉपच्या अभिनेत्री होत्या. त्यांनी हिंदीसोबतच तेलुगू, तामिळ, कन्नड आणि मल्ल्याळम भाषांच्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

त्यानंतर त्यांनी बॉलीवूडमध्ये देखील अनेक चित्रपटांमध्ये काम केले आणि त्या बॉलीवूडच्या टॉपच्या अभिनेत्री झाल्या. त्यांचा अभिनय आणि नृत्य अनेकांना वेड लावतो. त्यांच्या सुंदरतेचे करोडो चाहते आहेत. याच चाहत्यांच्या अभिनेता संजय दत्तचे नाव देखील येते.

संजय दत्त श्रीदेवी यांचा खुप मोठा चाहता होता. ८० च्या दशकात श्रीदेवी करिअरच्या टॉपवर होत्या. तर संजय दत्तने त्याच्या करिअरची सुरुवात केली होती.
श्रीदेवी अनेक साऊथसोबतच हिंदीमध्ये देखील काम करत होत्या. त्या एकदा मुंबईत त्यांच्या चित्रपटाची शुटिंग करत होत्या.

त्यावेळी त्यांना बघण्यासाठी त्यांचे अनेक चाहते शुटिंग लोकेशनवर आले होते. शुटिंगच्या ठिकाणी खुप मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. श्रीदेवी मुंबईत शुटिंग करत आहेत. ही गोष्ट संजय दत्तला समजली. मग काय संजू बाबाने आपल्या आवडत्या अभिनेत्री भेटायला जाण्याचा निर्णय घेतला.

पण त्यावेळी संजय दत्त खुप नशेत होता. त्याचे डोळे लाल झाले होते. म्हणून त्याच्या मित्रांनी त्याला शुटिंगच्या सेटवर जाण्यासाठी थांबवले. त्यावेळी त्याने मित्रांशी भांडण केली आणि अनेक गोष्टींची तोडफोड केली. शेवटी मित्रांनी त्याला सोडले.

शुटिंगच्या ठिकाणी खुप जास्त गर्दी होती. कोणालाही आत जाण्याची परवानगी नव्हती. पण संजय सुनील दत्तचा मुलगा होता. त्याला थांबवण्याची हिंमत कोणतंही नव्हती. संजय दत्त पूर्णपणे मद्यधुंद होता. त्याला चालत येत नव्हते. त्याचे डोळे लाल झाले होते.

अशा अवस्थेत त्याने सेटवर श्रीदेवीला शोधण्यास सुरुवात केली. पण त्या सेटवर नव्हत्या. त्याने सगळीकडे शोधा शोध करायला सुरुवात केली. शेवटी तो श्रीदेवीच्या रूमपर्यंत पोहोचला. संजय दत्त श्रीदेवीच्या रुममध्ये गेला.

संजय दत्तला पाहून श्रीदेवी यांना खुप मोठा धक्का बसला होता. कारण संजयची हालत खुप खराब झाली होती. त्याचे लाल डोळे आणि त्याचा तो अवतार बघून त्या खुप घाबरल्या. श्रीदेवी संजय दत्तला बघून थरथर कापत होत्या.

एवढेच नाही तर श्रीदेवी यांनी रडायला सुरुवात केली होती. पण संजयला या गोष्टी कळत नव्हत्या. कारण त्याला कोणत्याच गोष्टीचा होश नव्हता. तो नशेत होता. सेटवरील स्टाफने संजयला श्रीदेवीच्या रूममधून बाहेर काढले.

संजय दत्त त्या अवस्थेत सेटवर जोरजोरात ओरडून सांगत होता की, तो श्रीदेवीचा खुप मोठा फॅन आहे. थोड्या वेळाने श्रीदेवी रूमच्या बाहेर आल्या आणि त्यांनी धक्के मारून संजय दत्तला सेटवरुन हाकलून दिले.

या घटनेनंतर श्रीदेवी यांनी आयुष्यात कधीच संजय दत्तसोबत काम न करण्याचा निर्णय घेतला. संजय दत्तला या घटनेबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्याला काही आठवत नव्हते. पण तो अजूनही श्रीदेवीचा चाहता होता.

एका मुलाखतीमध्ये संजय दत्तने सांगितले होते की, ‘त्याला त्या दिवशी त्याने काय केले हे आठवत नाही. पण ज्यावेळी संजय चांगला स्टार झाला आणि त्याला श्रीदेवीसोबत काम करण्याच्या ऑफर येत होत्या. त्यावेळी श्रीदेवी त्याच्यासोबत काम करायला तयार नव्हत्या. म्हणून त्याला ही त्याच्या आयुष्यातील खुप मोठी चुक वाटते’.

श्रीदेवीने संजयसोबत दोन चित्रपटांमध्ये काम केले. कारण त्यासाठी संजयने अनेक वेळा त्यांची माफी मागितली. पण त्या फक्त कामासाठी सेटवर यायच्या आणि निघून जायच्या. त्यांनी कधीही संजयसोबत मैत्री केली नाही.

हे ही वाचा –

..म्हणून सनी देओलने ‘डर’ चित्रपटाच्या सेटवर सामान उचलून फेकले होते

अक्षयकुमारच्या सासुसोबत सनी देओलचे तब्बल ११ वर्षे अफेअर सुरू होते; घरी समजल्यावर मात्र..

हेमामालिनीने एक चुगलीमुळे धर्मेंद्रने गोविंदाच्या कानाखाली वाजवली होती; जाणून घ्या पुर्ण किस्सा..

एखाद्या चित्रपटाच्या फिल्मी स्टोरीप्रमाणे ‘या’ अभिनेत्याचे कुटुंब एका रात्रीत संपले

फेमस काॅमेडीयन राजू श्रीवास्तवला काम मिळणेही बंद झाले यामागे आहे हे धक्कादायक कारण

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.