श्रीदेवी आणि कमल हसनच्या नात्याचे ‘हे’ सत्य तुम्हाला माहीती आहे का?

फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनेक कलाकार एकत्र काम करत असताना त्यांच्या अफेअरच्या चर्चा होत असतात. म्हणून जास्त वेळा कलाकार एकत्र काम करणे टाळतात. असेच काही अभिनेत्री श्रीदेवी आणि अभिनेता कमल हसन यांच्याबद्दल झाले होते.

कमल हसन भारतातील सर्वात प्रभावशाली अभिनेत्यांपैकी एक आहेत. त्यांनी त्यांच्या अभिनयाने अनेक वर्षे प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. त्यांच्या दमदार अभिनयामूळे त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

कमल हसन असे अभिनेते आहेत. जे त्यांच्या पर्सनल आयुष्यामूळे जास्त चर्चेत राहायचे. कमल हसनचे नाव अनेक अभिनेत्रींशी जोडले गेले होते. रोज त्यांच्या अफेअर चर्चा व्हायच्या. म्हणून ते नेहमीच चर्चेत असणारे अभिनेते होते. आजही त्यांचे नाव अनेक अभिनेत्रींशी जोडले जाते.

कमल हसनने दोन लग्न केले आहेत. त्यांची अफेअर खुप चर्चेत होते. बॉलीवूडसोबतच त्यांनी साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणावर काम केले आहे. त्यांनी त्यांच्या करिअरची सुरुवातच फिल्म इंडस्ट्रीमधून केली होती.

साऊथमध्ये त्यांनी अनेक अभिनेत्रींसोबत काम केले होते. पण प्रेक्षकांना त्यांची जोडी सर्वाधिक आवडायची ती म्हणजे श्रीदेवींसोबत. श्रीदेवी आणि कमल हसन दोघांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांची जोडी सर्वात यशस्वी होती.

श्रीदेवीने कमल हसनसोबतच त्यांच्या करिअरची सुरुवात केली होती. सुरुवातीच्या काळात त्यांनी अनेक चित्रपट कमल हसनसोबत केले. या दोघांच्या जोडीला साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात रोमँटिक जोडी समजली जायचे.

या दोघांना एकत्र पाहून प्रेक्षकांना खुप आनंद व्हायचा. म्हणून चित्रपटांची निर्माते नेहमी या दोघांना एकत्र कास्ट करायचे. अनेक वेळा एकत्र काम केल्यामुळे या दोघांच्या अफेअरच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मीडियामध्ये या दोघांबद्दल अनेक गोष्टी बोलल्या जाऊ लागल्या होत्या.

श्रीदेवीच्या आईला देखील ही गोष्ट माहीती होती. त्यांची इच्छा होती की, श्रीदेवी आणि कमल हसनने लग्न करावे. प्रेक्षकांना देखील ही जोडी खुप आवडते. ज्यावेळी त्यांनी ही गोष्ट श्रीदेवीला सांगितली. त्यावेळी त्यांनी हसायला सुरुवात केली.

कारण मोठ्या पद्यावर एकमेकांसोबत रोमान्स करणारे श्रीदेवी आणि कमल हसन खऱ्या आयुष्यात मात्र एकमेकांना भाऊ बहीण मानत होते. श्रीदेवीने ही गोष्ट त्यांच्या आईला सांगितली त्यावेळी त्यांना धक्का बसला. कारण चित्रपटांमध्ये या दोघांची जोडी खुप छान वाटायची.

पण श्रीदेवी कमल हसनला मोठा भाऊ मानायच्या. त्या कमल हसनला नेहमी सर बोलायच्या. कारण ते श्रीदेवी पेक्षा खुप मोठे होते. कमल हसन श्रीदेवीला छोटी बहीण बोलायचे. चित्रपटांच्या सेटवर ते भावाप्रमाणे त्यांची काळजी घ्यायचे.

चित्रपटांमध्ये या दोघांना रोमँटिक जोडी म्हणून दाखवले जायचे. म्हणून श्रीदेवी आणि कमल हसनने त्यांच्या नात्याचे हे सत्य अनेक वर्षे प्रेक्षकांपासून लपवून ठेवले होते. २०१८ मध्ये श्रीदेवीचा मृत्यू झाला होता. त्यावेळी कमल हसनला खुप मोठा धक्का बसला होता.

श्रीदेवीच्या मृत्यूची बातमी ऐकून त्यांनी रडायला सुरुवात केली होती. शेवटपर्यंत हे दोघे एकमेकांना भाऊ बहीण मानत होते. श्रीदेवी नेहमी कमल हसनला सर म्हणूनच बोलायच्या. श्रीदेवीच्या मृत्यूने कमल हसनला खुप मोठा धक्का बसला होता.

महत्त्वाच्या बातम्या –

‘सोनपरी’ मालिकेतील फ्रुटी झाली आहे मोठी; दिसते खुपच सुंदर आणि ग्लॅमर्स पहा फोटो

हॉट आणि ग्लॅमर्स आमिषा पटेलने सांगितले लग्न न करण्यामागचे कारण

मनोजकुमारने डिंपलला मध्यरात्री फोन करून हाॅटेलवर बोलावले; पिसाळलेल्या राजेश खन्नाने काय केले बघा..

माधुरी दिक्षीत तुझी खाजगी प्रॉपर्टी नाही; जॅकी श्रॉफने अनिल कपूरला सुनावले; वाचा पुर्ण किस्सा..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.