अनेकदा फिल्म इंडस्ट्रीतील कलाकारांना एकमेकांसोबत काम करण्याची इच्छा असते. पण प्रत्येक कलाकाराची ही इच्छा पुर्ण होतं नाही. अनेक कलाकारांची इच्छा अपूर्ण असते. असाच एक कलाकार म्हणजे आमिर खान.
आमिर खान आज बॉलीवूडमधील सर्वात मोठा सुपरस्टार आहे. आमिरसोबत काम करण्यासाठी अनेक कलाकार तयार आहेत. असा एकही अभिनेता नाही ज्याने आमिर खानसोबत काम केले नाही. पण अशी एक अभिनेत्री आहे. जिच्यासोबत आमिर खानने काम केले नाही आणि आजही आमिरला त्याचा पश्चाताप होतो.
जाणून घेऊया या अभिनेत्रीबद्दल. या अभिनेत्रीचे नाव आहे श्रीदेवी. आमिर खान आणि श्रीदेवीने कधीच एकत्र काम केले नाही. म्हणून आमिर खानला खुप वाईट वाटते. असे बोलले जाते, या दोघांना एकत्र अनेक चित्रपट ऑफर झाले होते. पण श्रीदेवीने ते सगळे चित्रपट नाकारले.
श्रीदेवी बॉलीवूडच्या सर्वात मोठ्या सुपरस्टार आहेत. त्यांना बॉलीवूडच्या पहिल्या लेडी सुपरस्टार म्हणून ओळखले जाते. त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. ८० आणि ९० च्या दशकामध्ये श्रीदेवीचे बॉलीवूडमध्ये राज्य होते.
त्यांनी त्यांच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली होती. श्रीदेवीच्या नावावर अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करायचे. म्हणून त्या काळच्या प्रत्येक एक अभिनेत्याला आणि निर्मात्यांना श्रीदेवीसोबत काम करायचे होते.
या यादीत अभिनेता आमिर खानचे देखील नाव होते. आमिर खानचा ‘कयामत से कयामत तक’ चित्रपट सुपरहिट झाला होता. त्यामुळे त्याला अनेक चित्रपटांच्या ऑफर येत होत्या. याच कालावधीमध्ये आमिरला एका फोटोशुटची ऑफर आली.
आमिर खानने या ऑफरचा स्वीकार केला. या फोटोशुटमध्ये आमिरसोबत श्रीदेवी होत्या. त्यामुळे आमिर खुप आनंदी झाला होता. त्याला पहिल्यांदा श्रीदेवीसोबत काम करण्याची संधी मिळाली होती. श्रीदेवीचे काम बघितल्यानंतर आमिरला त्यांच्यासोबत चित्रपटामध्ये काम करण्याची इच्छा झाली.
त्याने अनेक निर्मात्यांना सांगितले होते की, त्याला श्रीदेवीसोबत काम करायचे आहे. म्हणून त्यांनी श्रीदेवीसाठी चांगल्या चित्रपटाची स्क्रिप्ट शोधावी. महेश भट्ट, सुभाष घईसोबतच बॉलीवूडच्या अनेक मोठ्या दिग्दर्शकांनी या दोघांना एकत्र कास्ट करण्याचा निर्णय घेतला.
श्रीदेवीला आमिर खानसोबत अनेक चित्रपटांच्या ऑफर आल्या होत्या. पण त्यांनी सगळ्या ऑफर नाकारल्या होत्या. कारण श्रीदेवीला आमिर खानसोबत काम करण्याची इच्छा नव्हती. म्हणून त्यांनी सगळ्या चित्रपटांना नकार दिला.
ज्या वेळी श्रीदेवीला आमिरसोबत काम न करण्याचे कारण विचारण्यात आले त्यावेळी त्यांनी सांगितले की, ‘मी आमिरसोबत एका फोटोशुटसाठी काम केले होते. त्यावेळी मला खुप वाईट अनुभव आला. म्हणून मला आमिर खानसोबत काम करण्याची इच्छा नाही’.
असे बोलले जाते की, फोटोशुटच्या वेळी आमिर खान खूप मोठ्या सुपरस्टार प्रमाणे वागत होता. त्याला प्रत्येक गोष्ट त्याच्या पद्धतीनुसार हवी होती. तो विसरला होता की, तो श्रीदेवीसोबत काम करत आहे. हिच गोष्ट श्रीदेवीला आवडली नाही. म्हणून त्यांनी परत कधीच आमिर खानसोबत काम केले नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
८० च्या दशकात लग्न न करता आई झाली होती ‘ही’ अभिनेत्री; आज मुलगी आहे प्रसिद्ध डिझायनर
श्रीदेवीच्या लाईव्ह शो दरम्यान धर्मेंद्रने दारु पिऊन केला होता तमाशा कारण…
दिलफेक सैफ अली खानला प्रीती झिंटामुळे खावा लागला होता बायको अमृताचा मार
रजनीकांत आणि माधुरी दीक्षितची जवळीक वाढत होती; म्हणून दिग्दर्शकाने चित्रपटाची स्क्रिप्ट बदलली