मराठमोळ्या श्रेयसला बाॅलीवूडमध्ये सिनेमे का मिळत नाहीत? स्वत: श्रेयसनेच सांगीतले ‘ते’ घाणेरडे कारण

बॉलिवूड अभिनेता श्रेयस तळपदेने अनेक मराठी हिंदी सिनेमा काम केले आहे. आता मात्र तो बॉलिवूडपासून दुर झालेला दिसता. सिनेमामृष्टीत श्रेयस एक नामांकित अभिनेता म्हणून ओळखला जातो. त्याने मराठीसोबतच बॉलिवूच्या चित्रपटांमध्येही आपली छाप सोडली आहे.

एकेकाळी प्रेक्षकांना आपल्या अभिनयामुळे भरभरुन कौतूक करायला लावणाऱ्या श्रेयसच्या करीयरला आता उतरती कळा लागल्याचे दिसून येत आहे. श्रेयस टाईम्स ऑफ इंडियाला नुकतीच एक मुलाखत दिली आहे. त्यामध्ये त्याने त्याच्या करीयरविषयी अनेक खुलासे केले आहे.

स्वत:चे मार्केटिंग करणे कधी जमले नाही. एखादे ऑडिशन द्यावे, जो रोल मिळाला तो प्रामाणिकपणे केला. पण आज मार्केटिंग करणे खुप महत्वाचे झाले आहे, तुमच्या कामापेक्षा जास्त तुमच्या प्रसिद्धीला महत्व आहे, असा धक्कादायक खुलासा श्रेयसने मुलाखतीत केला आहे.

मार्केटिंग मला कधीच जमली नाही. मला जो रोल मिळाला तो प्रामाणिक केला आणि नंतर दुसरा प्रोजेक्ट शोधला. अशा पद्धतीने मी माझ्या करीयरकडे पाहिले. अनेक कलाकार काम न करता चर्चेत असतात. माझ्या बाबतीत असे झाले, कारण मी कधीच मार्केटिंग केले नाही, असे श्रेयसने म्हटले आहे.

तसेच माझा माझ्या कामावर खुप विश्वास होता.पण आज तुमच्या अभिनयापेक्षा तुमच्या प्रसिद्धीला महत्व आहे. त्यामुळेच अभिनय करता न येणारे कित्येक कलाकार बिग बजेट फिल्ममध्ये तुम्हाला दिसून येतात, असेही श्रेयसने म्हटले आहे.

मार्केटिंग मला जमली नाही, पण ज्या मित्रांवर विश्वास होता, त्यांनी पण मला फसवलं. मला असे कळाले की काही अभिनेते माझ्यासोबत स्क्रिन शेअर करायला असुरक्षित समजतात. त्यामुळे मी त्यांच्या चित्रपटात नसावं असे त्यांना वाटते. मी काही चित्रपट फक्त मित्रांच्या हितासाठी केले पण त्यांनीच माझ्या पाठीत सुरा खुपसला आहे, असे श्रेयसने म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

रियल सिंघमने उडवली दौंडमधील काळे धंदेवाल्यांची झोप! सर्व धंदे बंद करत केला साडेचार कोटींचा माल जप्त
VIDEO: मासे पकडायला गेलेल्या तरुणाच्या मागे लागली मगर, मग पहा पुढे काय झालं…
‘खतरों के खिलाडी ११’ ची राखीने केली भविष्यवाणी; सांगितले कोण आहे या सीझनचा विनर?

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.