…आणि ती त्याला पेट्रोलला पैसे द्यायची; वाचा श्रेयस तळपदेची भन्नाट लव्ह स्टोरी

बॉलीवूड आणि मराठी चित्रपटामध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणारे अभिनेते अनेक आहेत. असाच एक अभिनेता म्हणजे श्रेयश तळपदे. मराठी सिनेसृष्टीसोबतच श्रेयस बॉलीवूडमध्ये देखील खुप प्रसिद्ध आहे. त्याने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.

२००५ मध्ये रिलीज झालेल्या ‘इकबाल’ चित्रपटामूळे त्याला खरी ओळख मिळाली होती. त्यानंतर त्याने मागे वळून पाहीले नाही. हिंदीमध्ये गोलमाल, दौड, ओम शांती ओम, वेलकम टु सज्जनपुर अशा चित्रपटांमध्ये काम केले. तर मराठीमध्ये पछाडलेला, सावरखेड एक गाव, आई शपथ्थ अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले.

मराठमोळ्या श्रेयसने बॉलीवूडमध्ये देखील वेगळी ओळख निर्माण केली. श्रेयस त्याच्या या यशाचे सगळे श्रेय त्याच्या पत्नीला देतो. त्याची पत्नी नेहमी त्यासोबत खंभीरपणे उभी होती. म्हणून तो करिअरमध्ये एवढा पुढे जाऊ शकला. श्रेयस आणि दिप्तीची लव्ह स्टोरी देखील तेवढीच रंजक आहे.

दोघांची भेट एका कार्यक्रमामध्ये झाली होती. दिप्तीला पाहताच क्षणी श्रेयस तिच्या प्रेमात पडला होता. त्याने वेळ न घालवता दिप्तीला लग्नासाठी प्रपोज केले. जाणून घेऊया दिप्ती आणि श्रेयसची लव्ह स्टोरी.

श्रेयसने टेलिव्हिजनवरुन त्याच्या करिअरची सुरुवात केली होती. त्याने मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये काम केले होते. त्यामूळे त्याला सगळीकडे ओळखले जात होते. या कालावधीमध्ये श्रेयसला त्याच्या एका मित्राने कॉलेजच्या कार्यक्रमामध्ये प्रमूख पाहूणा म्हणून बोलवले. त्याने या कार्यक्रमाला होकार दिला.

या कार्यक्रमामध्ये दिप्ती सेक्रटरी होती. दिप्तीला पाहताच क्षणी श्रेयस तिच्या प्रेमात पडला होता. त्याने वेळ न घालवता दिप्तीला लग्नासाठी प्रपोज केले. तिने देखील होकार दिला. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

दिप्ती आणि श्रेयस रिलेशनशिपमध्ये होते. त्यावेळी श्रेयसने त्याच्या करिअरची सुरुवात केली होती. त्यामूळे त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. अशा परिस्थितीमध्ये दिप्ती नेहमीच त्याच्यासोबत होती. अनेक वेळा दिप्तीने श्रेयला गाडीत पेट्रोल भरण्यासाठी पैसे दिले होते.

कोणतीही अडचण आली तरी दिप्ती श्रेयससोबत असायची. दोघांचे एकमेकांवर खुप प्रेम आहे. २००४ साली दिप्ती आणि श्रेयस लग्नबंधनात अडकले. २००८ मध्ये दोघांना मुलगी झाली. एवढ्या वर्षांनंतरही दोघे सुखाने संसार करत आहेत. श्रेयस सध्या त्याच्या नवीन प्रोजेक्टवर काम करत आहे.

महत्वाच्या बातम्या –

…म्हणून कपूर कुटुंबाने जेष्ठ अभिनेते राजीव कपूर यांची शोकसभा घेतली नाही

जॅकलीनचा हा स्टंट पाहीला का? पाहून तुम्हालाही पडेल भुरळ

‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकणार लग्नाच्या बेडीत; होणाऱ्या नवऱ्याला आहे एक मुलगी

‘तुझ्यात जीव रंगला’मधील अभिनेत्रीने गुपचूप उरकला साखरपूडा; फोटो पाहून तुम्हाला बसेल धक्का

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.