Share

Shreyas Talpade : करोडो रूपयांच्या फसवणुकीचा आरोप, अखेर श्रेयस तळपदेने सोडले मौन; म्हणाला, हे पुर्णपणे…

Shreyas Talpade : अभिनेता श्रेयस तळपदे चिट फंड घोटाळ्यात सामील असल्याच्या अफवांमुळे सध्या चर्चेत आले आहेत. या पार्श्वभूमीवर त्याच्या टीमने एक अधिकृत निवेदन जारी करत त्याच्या नावावर होणाऱ्या आरोपांना खोटं आणि निराधार ठरवलं आहे. टीमने सांगितले की, श्रेयस तळपदे यांचा फसवणूक किंवा गैरवर्तनात सहभाग असण्याचा कोणताही आधार नाही आणि या बाबतीतची माहिती पूर्णपणे चुकीची आहे.

श्रेयसच्या इन्स्टाग्रामवर त्याच्या टीमकडून हे निवेदन शेअर करण्यात आले असून, अभिनेता श्रेयस तळपदेने देखील आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर या निवेदनाचा प्रसार केला. निवेदनात असे म्हटले आहे, “आजच्या काळात एखाद्या व्यक्तीची प्रतिष्ठा निराधार अफवांमुळे धूमिल होणे खूप दुर्दैवी आहे. श्रेयस तळपदे यांच्यावर फसवणूक किंवा बेकायदेशीर कृत्यांचे आरोप करणारे रिपोर्ट्स पूर्णपणे खोटे आणि निराधार आहेत.”

टीमने असेही स्पष्ट केले की, श्रेयस तळपदे हे एक सार्वजनिक व्यक्तिमत्त्व असल्याने त्यांना अनेक कॉर्पोरेट आणि वार्षिक कार्यक्रमांसाठी आमंत्रित केले जाते, पण त्यांचा संबंधित कंपनीसोबत कोणताही व्यवसायिक संबंध नाही. त्यावरून, तळपदे यांना या चिट फंड घोटाळ्यात सहभागी ठरवण्याची कोणतीही कारण नाही, अशी स्पष्टीकरण दिली आहे.

तसेच, श्रेयसच्या टीमने सर्वांना चुकीच्या माहितीच्या प्रसारापूर्वी तथ्यांची पडताळणी करण्याचे आवाहन केले आणि तळपदे यांचे नाव या निराधार अफवांपासून दूर ठेवण्याची विनंती केली. टीमने म्हटले आहे की, “तळपदे हे कायद्याचे पालन करणारे नागरिक आहेत आणि ते त्यांच्या कार्यात प्रामाणिकपणाची, सचोटीची आणि व्यावसायिकतेची सर्वोच्च मानके राखण्यासाठी वचनबद्ध आहेत.”

काय आहे प्रकरण?

गुरुवारी, श्रेयस तळपदे आणि इतर १४ जणांविरुद्ध उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या चिट फंड घोटाळ्यात आरोपी असलेली कंपनी “द लोनी अर्बन मल्टीस्टेट क्रेडिट अँड थ्रिफ्ट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड” होती, जी उच्च परतावा देण्याचे आश्वासन देऊन ग्रामस्थांची फसवणूक करत होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, श्रेयस तळपदे या कंपनीचे प्रमोटर होते आणि त्यांनी या कंपनीसाठी जाहिरात केली होती.

जेव्हा या योजनेवर कायदेशीर प्रश्न निर्माण झाले, तेव्हा कंपनीच्या एजंट्सने काम थांबवले आणि ते गायब झाले. आता महोबा पोलिसांनी श्रीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now