Shreya Bugde : काही दिवसांपूर्वीच झी मराठीवर ‘बस बाई बस’ हा कार्यक्रम सुरु झाला आहे. या कार्यक्रमाने कमी काळात भरपूर प्रसिद्धी मिळवली आहे. या कार्क्रमामध्ये अनेक मोठमोठ्या महिला कलाकारांसह राजकारणीही हजेरी लावत असतात.
मराठी चित्रपटसुष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे ‘बस बाई बस’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत असतो. नुकतीच लोकांना खळखळून हसवणारी अभिनेत्री श्रेया बुगडे या कार्यक्रमामध्ये आली होती. यावेळी तिने तिचे अनेक किस्से प्रेक्षकांसोबत शेअर केले.
यातच तिने मराठी चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या जेष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांचा एक किस्सा प्रेक्षकांशी शेअर केला. यावेळी उषा नाडकर्णी यांना ती घाबरत असल्याचे तिने सांगितले. श्रेया बुगडे अनेक कलाकारांची मिमिक्री करण्यात तरबेज आहे.
श्रेयाने एकदा अशीच उषा नाडकर्णींची मिमिक्री केली होती. त्यानंतर तिला स्वतः उषा नाडकर्णींचा फोन आला. त्यावेळी श्रेया एकदम घाबरून गेली. आपल्याला रागवण्यासाठीच त्यांचा फोन आला आहे असे तिला वाटले.
हा किस्सा सांगताना श्रेया बुगडे म्हणाली की, मला त्यांचा फोन आल्यावर मी सरळ फोन उचलून बोलायला सुरुवात केली. “तुला मला काय बोलायचे ते बोल. मला माहिती आहे माझी चूक झाली आहे, मी परत असं कधी करणार नाही. तुला मला काय बोलायचं आहे ते बोलून घे, तू मला मार,” असे ती फोनवर बोलली.
त्यानंतर उषा नाडकर्णी थोडावेळ यावर काहीच बोलल्या नाही. पुढे त्या बोलल्या, “काय झालं गं. अगं बरं केलंस तू, छान करतेस. मी काही ते बघितलं नाही. मला कुणीतरी फोन केला, व्हिडीओ पाठवला. अगं ती श्रेया बुगडे तुझं करतीये बघ. म्हणून मी बघितला. चांगलं केलंस. दुसरं कोणी केलं ना तर ते नाही मी खपवून घेणार.”
श्रेया बुगडेने उषा नाडकर्णींचा हा किस्सा सांगतानाही त्यांच्याच आवाजात आणि शैलीत सांगितला. त्यामुळे तिथे उपस्थित सर्वांजण हसू लागले. झी मराठीने इंस्टाग्रामवर या प्रसंगाचा व्हिडिओही शेअर केला आहे.
महत्वाच्या बातम्या
Narayan Rane : अधीश बंगल्यावर महापालिकेचा हातोडा पडणार ; नारायण राणेंना कोर्टाचा दणका
raju srivastav : राजू श्रीवास्तव काळाच्या पडद्याआड! वयाच्या 59 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Eknath shinde : जळगावात मुख्यमंत्र्यांच्या भाषणाआधीच सभास्थळातून लोकांनी घेतला काढता पाय, घटनेचा VIDEO तुफान व्हायरल
pm narendra modi : “नरेंद्र मोदींचं वागणं दारूड्यासारखं झालंय”, प्रकाश आंबेडकर स्पष्टच बोलले