कुंभमेळ्यात सहभागी झाले होते संगीतकार श्रवण अन् त्यानंतरच त्यांचा कोरोनाने मृत्यू झाला; मुलाने केला गौप्यस्फोट

कोरोनाच्या संकटाने अनेक दिग्गज कलाकार कलासृष्टीतून हिरावून घेतले आहे. असे असताना नदीम श्रवण या संगीतकार जोडीतले श्रवण राठोड यांचे काल कोरोनामुळे निधन झाले आहे. ते ६६ वर्षांचे होते.

कोरोनाचा संसर्ग झाल्याने श्रवण यांची प्रकृती खालावली होती. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण दवाखान्यात उपचार घेत असतानाच त्यांची प्राणज्योत मावळली होती. असे असताना कोरोना होण्याआधी ते कुंभमेळ्यात गेले होते, अशी माहिती समोर आली आहे.

श्रवण आणि त्यांची पत्नी कुंभमेळ्यात गेले होते. तिथून परत आल्यानंतरच त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यानंतर त्यांची कोरोना चाचणी केली असता, ते आणि त्यांच्या पत्नी कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे आढळून आले होते. श्रवण यांचा मुलगा संजीवने एका वृत्तसंस्थेला याबाबत माहिती दिली आहे.

आम्हाला कधी वाटले नव्हते, की आम्हाला अशा कठीण प्रसंगाचा सामना करावा लागेल. माझ्या वडिलांचे निधन झाले आहे. मी आणि माझी आई कोरोनाबाधित आहोत. तसेच माझ्या भावालाही कोरोनाची लागण झाली असून त्याला क्वारंटाईन करण्यात आले आहे, असे संजीवने म्हटले आहे.

माझी आई विमलादेवी आणि मी एकत्रच असून आता आम्ही बरे होत आहोत.अशा काही अफवा ऐकायला मिळत आहे, की रुग्णालय आम्हाला आमच्या वडिलांचे शव देत नाही. पण हे खरं नाही. रुग्णालयाने आम्हाला वेळोवेळी मदत केली आहे, असेही संजीवणे म्हटले आहे.

दरम्यान, श्रवण राठोड शनिवारी रुग्णालयात दाखल झाले होते. ६६ वर्षे वय असल्याने डॉक्टरांनी त्यांची परिस्थिती नाजूक असल्याचे सांगितले होते. गुरुवारी रात्री १० वाजता त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता, त्यामुळे त्यांचे निधन झाले आहे.

महत्वाच्या बातम्या-

कोरोना काळात चोरांचा दिलदारपणा! चिठ्ठी लिहून चोरलेल्या १७०० लसी केल्या परत
आता लवकरात लवकरे बरे होणार कोरोना रुग्ण; Zydus cadila च्या ‘त्या’ औषधाला मंजूरी
कोरोना झालेल्या प्रसिद्ध पुजाऱ्याच्या मदतीला धावून आले असदुद्दीन औवेसी; केली मोठी मदत

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.