श्रद्धा कपूरची पर्सनल चॅट सोशल मीडियावर लीक, तीन हार्ट इमोजीवाली ‘ही’ व्यक्ती कोण?

मुंबई। अभिनेत्री श्रद्धा कपूर ही अनेकांची आवडती व प्रसिद्ध अभिनेत्री आहे. श्रद्धा कायम चित्रपटांमध्ये उत्तम अभिनय करते व चाहत्यांचं मन जिंकून घेते. ती सोशल मीडियावर देखील कायम ऍक्टिव्ह असते. तिचा चाहता वर्गदेखील मोठा आहे. त्यामुळे श्रद्धा छोटया मोठ्या कारणांमुळे कायम चर्चेत असते.

मात्र यावेळी वेगळ्याच कारणामुळे सध्या श्रद्धा चर्चेचा विषय ठरली आहे. या चर्चेचा विषय म्हणजे श्रद्धा कपूरची पर्सनल चॅटचे फोटोज. श्रद्धा मुंबईत तिच्या आगामी चित्रपटाच्या सेटच्या बाहेर दिसली होती. ज्यावेळचे काही फोटो पापाराझींनी सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत.

या फोटोंमध्ये श्रद्धाने निळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे आणि हातात मोबाईल घेऊन चॅट करण्यात व्यस्त आहे. श्रद्धाच्या फोटोंबरोबरच पापाराझींनी तिच्या वैयक्तिक व्हॉट्सअॅप चॅटचे फोटोही व्हायरल केले आहेत.

खास इमोजीने श्रद्धाने खास व्यक्तीचा नंबर सेव्ह केला आहे. श्रद्धा म्हणते, ‘मी माझ्या आयुष्यात काधी तुझ्यासारख्या व्यक्तीला भेटली नाही.’ श्रद्धाच्या या मेसेजला उत्तर येतो, ‘मला फार आनंद आहे तु माझ्याबद्दल असा विचार करते. ‘ यानंतर श्रद्धा म्हणते, ‘तु खरंच ऐकतो.. असं कोणी नाही. तुझ्यामुळे मला कायम स्पेशल फिल होतं. ‘ यावर लाल रंगाचं बदाम येतं.

त्यानंतर श्रद्धा म्हणते “होय तू करतोस. माझी सर्व स्वप्ने आणि इच्छा पूर्ण केल्याबद्दल धन्यवाद.” यावर त्या व्यक्तीचे उत्तर येते, “हे माझे भाग्य आहे. जेव्हा तुला काही हवे असेल, तेव्हा मला सांग.”

सध्या श्रद्धाचे हे चॅट्स व्हायरल झाल्यानं फोटो लीक केल्याबद्दल पापाराझींच्या या कृत्यामुळे सोशल मीडिया वापरकर्ते आणि श्रद्धाचे खूप संतापले आहेत आणि त्यांच्यावर तीव्र टीका करत आहेत. कोणाच्या वैयक्तिक आयुष्यात हस्तक्षेप करू नका. असं चाहत्यांनी सुनावलं आहे.
महत्वाच्या बातम्या
किम जोंग उन पडले पुन्हा आजारी; समोर आलेल्या धक्कादायक फोटोंनी उडाली तिथल्या नागरीकांची झोप
VIDEO; बस सावकाश चालवण्यास सांगितल्यानं एस. टी. कर्मचाऱ्यांकडून वयोवृद्ध दाम्पत्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण
…अन् उठल्यावर बघतो तर काय तीन हिंस्त्र चित्ते त्याच्याबाजूला झोपलेले; पहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
मुळव्याध बरा करण्यासाठीचा अघोरी उपाय बेतला जीवावर; ढूंगनातून घातला २० सेमी लांबीचा मासा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.