कपूर घराण्यात सनई चौघडे! श्रद्धा लवकरच अडकणार लग्नबेडीत, मुलाच्या घरून आला होकार

मुंबई | बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर लकरच विवाहबंधनात अडकणार असल्याची चर्चांनी आणखीच जोर धरला आहे. २०१८ पासून श्रद्धा रोहन श्रेष्ठीला डेट करत असल्याचे म्हटले जाते. परंतु आता रोहन श्रेष्ठीचे वडिल राकेश श्रेष्ठी यांनी दोघांच्या नात्याला माझा पाठींबा असल्याचे म्हटले आहे. हे वृत्त बाहेर येताच दोघांच्या लग्नाच्या चर्चाना वाव मिळाला आहे.

रोहन श्रेष्ठी हा भारतातले दिग्गज फोटोग्राफर राकेश श्रेष्ठी यांचा मुलगा आहे. रोहन यानेही वडिलांप्रमाणे फोटोग्राफी क्षेत्रात आपली नवी ओळख निर्माण केली आहे. रोहन श्रेष्ठी हे फोटोग्राफी क्षेत्रातील मोठे नाव बनले आहे.

दरम्यान, रोहनचे वडिल राकेश श्रेष्ठी यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत रोहन आणि श्रद्धा यांच्याबाबत मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले रोहन आणि श्रद्धा खूप जुने मित्र आहेत. हे मला माहित आहे. महाविद्यालयीन काळापासून हे दोघ ऐकमेकांसोबत आहेत. दोघेही आपल्या व्यावसायिक आयुष्यात चांगले काम करत आहेत. जर अशी काही गोष्ट असेल, तर मला त्याबद्दल नक्कीच माहित झाले असते.

रोहन आणि श्रद्धा यांच्या लग्नाबद्दलच्या प्रश्नाला उत्तर देताना रोहनचे वडील म्हणाले की, जर दोघांनाही एकमेकांची सोबत आवडत असेल तर आणि एकत्र राहायचे असेल तर चागंली गोष्ट आहे. दोघेही सज्ञान आहेत त्यांच्या निर्णय ते काळजीपूर्वक घेतील. जर तुम्ही माझे मत विचारत असाल तर या नात्याला माझा काही अक्षेप नाही. जर दोघांना लग्न करायचे असेल तर मी त्यांच्यासाठी सर्व काही आनंदाने करण्यास तयार आहे.

रोहन श्रेष्ठी याच्या वडिलांनी दिलेली ही माहिती बाहेर येताच सोशल मीडियावर अनेक चर्चांना उधाण आले आहे. चाहते त्यांच्या लग्नाची तारीख विचारताना दिसत आहेत. परंतु श्रद्धा किंवा रोहन यांनी उघडपणे याबाबत अद्याप कोणती माहिती दिलेली नाही.

महत्वाच्या बातम्या-
प्रेमात वेड्या झालेल्या श्रद्धा कपूरला बापाने हाताला धरून फरहानच्या घराबाहेर काढले होते
ड्रग्स प्रकरणात अडकलेल्या श्रद्धा कपूरचे वडील शक्ती सुशांतवरील चित्रपटात करणार ‘ही’ भूमिका
तुझ्यात जीव रंगला! साहेबरावच्या आठवणीने राणादा झाला भावूक, पोस्ट शेअर करत म्हणाला…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.