VIDEO: अरे बाप रे! श्रद्धा कपूरच्या घरात अचानक घुसला गोरीला, पाहा पुढे काय झालं..

बॉलिवूडची अप्रतिम डान्सर आणि सुंदर अभिनेत्री श्रद्धा कपूर सोशल मिडीयावर सतत ऍक्टीव्ह असते. ती सतत सोशल मिडीयावर सतत काहीना काही पोस्ट करत असते. सध्या ती चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यस्त आहे. तिचा नवीन चित्रपट येत आहे त्याचे नाव आहे चालबाज इन लंडन.

पण सध्या ती एका वेगळ्याच विषयामुळे चर्चेत आली आहे. तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यामध्ये एक गोरीला आहे. श्रद्धाच्या घरात अचानक एक गोरीला शिरला आहे. मात्र त्या गोरीलाला पळवून लावायच्या ऐवजी आणि त्याला घाबरून पळून जाण्याच्या ऐवजी ती त्याच्यासोबत डान्स करताना दिसत आहे.

तिचा हा व्हिडीओ पाहून चाहते अवाक झाले आहेत. या व्हिडीओमध्ये अतिशय भयानक आणि बलाढ्य असा गोरीला तिच्यासोबत दिसत आहे. मात्र ती त्याला घाबरत नाहीये उलट त्याच्यासोबत मस्ती करत आहे. पण हा व्हिडीओ एका चित्रपटाच्या प्रमोशनचा भाग आहे.

हा चित्रपट आहे हॅलो चार्ली. हा साहसी कथेवर आधारित एक चित्रपट आहे जो लवकरच ऍमेझॉन प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात तुम्हाला टोटो गोरीला आणि साधा सरळ चार्ली यांची जुगलबंदी पाहायला मिळणार आहे.

दरम्यान, श्रद्धा कपूर लवकरच चालबाज इन लंडन या चित्रपटात झळकणार आहे. यामध्ये ती दुहेरी भुमिकेत दिसणार आहे. तिचे चाहते हा चित्रपट पाहण्यासाठी खुप उत्सुक आहेत. याशिवाय श्रद्धा निखिल द्विवेदीच्या नागीन चित्रपटातही एका इच्छाधारी नागीनची भुमिका साकारताना दिसणार आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.