शरद पवारांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी प्रार्थना, ११ रुद्राक्ष महापुजन करत राष्ट्रवादी सेवादलाचे देवाला साकडे

 

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ब्रीचकँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर आता त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

असे असताना आता शरद पवार यांची प्रकृती स्वास्थ्यासाठी नवी मुंबईतील राष्ट्रवादी सेवादलाने देवाला साकडे घातले आहे. तसेच शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी कामोठे परिसरात ११ रुद्राक्ष महापुजन आणि महामृत्युंजय जप करण्यात आला आहे.

कामोठे येथील शिवमंदीरात या पुजेचे आयोजन करण्यात आले होते. या पुजेला पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील राष्ट्रवादी सेवादलाचे कार्यकर्ते उपस्थित होते. शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी आणि त्यांना दिर्घआयुष्य लाभो यासाठी ही पुजा करण्यात आली होती.

विशेष म्हणजे ही संपुर्ण पुजा कोरोना संबंधीचे सर्व नियम आणि सोशल डिस्टन्सिंग यासर्व नियमांचे पालन करुन पार पडली आहे. शरद पवार यांच्या प्रकृतीसाठी राज्यभरात कार्यकर्ते देवाला साकडे घालत प्रार्थना करताना दिसून येत आहे.

दरम्यान, ३० मार्च रोजी शरद पवारांना पोट दुखीचा त्रास उद्भवला होता, त्यामुळे त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यादिवशीच शस्त्रक्रिया करुन त्यांच्या पित्ताशयातून खडा काढण्यात आला होता. त्यानंतर शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने शनिवारी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.