मध्य प्रदेशातील(Madhya Pradesh) इंदूरमध्ये(Indore)’बग्समिरर’ नावाची कंपनी चालवणाऱ्या अमन पांडेला गुगल कंपनीने चुका शोधून काढल्याबद्दल ६६ कोटी रुपयांचे बक्षीस दिले आहे. अमन पांडेने(Aman Pande) गुगलमधील सुमारे ३०० चुका शोधून काढल्या आहेत. यासाठी गुगल कंपनीने त्याला हे बक्षीस दिले आहे. अमन पांडे हा मूळचा झारखंडचा आहे.(shopkeeper son become millioner google company 65 corer)
अमन पांडे याने इंदूरमध्ये २ महिन्यांपूर्वी ‘बग्समिरर’ नावाने स्वतःची कंपनी सुरू केली आहे. अमनच्या ‘बग्समिरर’ नावाच्या कंपनीमध्ये सुमारे १५ सदस्य आहेत. पण अमन जवळपास २ वर्षांपासून गूगलमधील छुप्या त्रुटी शोधण्यात मग्न होता. त्याला आतापर्यंत गुगलमध्ये ३०० पेक्षा जास्त चुका आढळून आल्या आहेत.
अमन पांडेला याआधी सॅमसंग कंपनीने चुका (बग) शोधून दिल्याबद्दल बक्षीस दिले होते. अमन पांडे याने भोपाळ एनआयटीमधून बीटेक ची पदवी मिळवली आहे. त्याचे कुटुंबीय अजूनही झारखंडमध्ये राहतात. अमनचे वडील स्टेशनरीचे दुकान चालवतात.अमन पांडे याला गूगलकडून मिळालेल्या बक्षीसाच्या रकमेबद्दल विचारले असता, त्याने याबाबत स्पष्ट माहिती दिली नाही. पण गुगल कंपनीने आतापर्यंत अनेक भेटवस्तू पाठवल्याचे त्याने सांगितले.
अमन पांडे ‘बग्समिरर’ कंपनीच्या माध्यमातून सध्या अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये काम करत आहेत. भोपाळमधून B.Tech केल्यानंतर अमनने २०२१ मध्ये आपली कंपनी नोंदणीकृत केली. अमन पांडे यांची ‘बग्समिरर’ ही कंपनी Google, Apple आणि इतर कंपन्यांना त्यांची सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत बनवण्यात मदत करते. अमन त्याच्या टीमसोबत इंदूरमध्ये काम करतो.
अमन पांडे याने २०१९ मध्ये प्रथमच Android Vulnerability Reward Program (VRP) अंतर्गत आपला अहवाल दिला होता. तेव्हापासून त्याने Android Vulnerability Reward Program (VRP) साठी २८० हून अधिक कंपन्यांच्या चुका शोधून काढल्या आहेत. गेल्या वर्षी, या माध्यमातून कंपनीला २२० सुरक्षा अहवालांसाठी २,९६.,००० डॉलर मिळाले आहेत.
बग्स मिरर कंपनीचे संस्थापक अमन पांडे यांच्या मते, त्यांची कंपनी अँड्रॉइड आणि इतर ऑपरेटिंग सिस्टिमवर संशोधन करत आहे. त्यांनी गेल्या तीन ते चार वर्षांत अशी यंत्रणा तयार केली आहे की, ज्याद्वारे लवकरात लवकर चुका शोधल्या जातील. त्यांनी यावर्षी गूगल कंपनीच्या व्यतिरिक्त इतर अनेक नामांकित कंपन्यांच्या चुका शोधून काढल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या :-
वडापाववर ताव मारून पैसै न देताच नेते झाले सैराट, मग कार्यकर्त्यांनीच भरलं बिल, बिलाचा व्हिडीओ व्हायरल
अभी तो मैं जवान हूं! १०० व्या वर्षी आजोबा चढले बोहल्यावर, नवरीचं वय वाचून अवाक व्हाल
मोठा खुलासा! भय्यू महाराजांचे 12 तरुणींसोबत होते संबंध, यापैकी दोघी तर होत्या आयएएस अधिकारी..