गांजाच्या शॉपमध्ये चोरी करण्याचा प्लॅन होता चोरांचा, एकट्या कर्मचाऱ्याने तिघांना लावले पळवून; पहा थरारक व्हिडिओ

चोरीच्या अनेक घटना घडत असतात, काही वेळा चोर पुर्ण प्लॅन करुन चोरी करण्यासाठी येतात, पण त्यांचा प्लॅन फसतो असेही काही व्हिडिओ समोर येत असतात आताही असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

कॅनेडाच्या एका टायन्डीनागा मोहॉक टेरिटरी नावाच्या गांजाच्या दुकानाला चोरांनी लक्ष्य केले होते. या ठिकाणी गांजा चोरी करण्याचा प्लॅन चोरट्यांचा होता, पण तिथे काम करणाऱ्या एका माणसाने त्या तीन चार चोरांना पळवून लावले आहे. याचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. शून्व्हिलमधील हायवेवर असलेल्या या शेतकरी दुकानात हुडी घातलेले तीन पुरुष घुसले आणि स्टोअरमध्ये काम करणाऱ्या पुरुष आणि महिलेवर मिरपूड फवारणी सुरू केली.

त्यावेळी तिथे असलेल्या त्या पुरुषाने एक हातात आलेली एक वस्तु घेतली आणि तो त्या चोरांच्या दिशेने नेला. हे पाहून त्या चोरांनी त्याला विरोध केला पण तो काही घाबरला नाही आणि तिथे आलेल्या तिन्ही चोरांना त्यांनी पळवून लावले आहे.

जोशुआ लुईस-ब्रँट आणि त्याची पत्नी तिथे दुपारी काम करणारे कर्मचारी होते आणि त्यांनी सांगितले की जेव्हा नंबर प्लेट झाकलेली कार शॉप पुढे आली होती. त्यावेळी ती कार पाहून दोघांनाही संशय आला.

लुईस-ब्रँट म्हणाले, माझ्या पत्नीने दरवाजा बाहेर पाहिले तेव्हा तीन मुखवटे घातलेले लोक दरवाजाकडे येता होते. ती माझ्याकडे वळली आणि म्हणाली की हे लोक काही चांगले नाहीत. त्यामुळे त्यांना पळवून लावण्यासाठी मी काहीतरी करण्याचे ठरवले आणि लगेच माझ्या हाताला जे लागेल ते घेतले आणि त्यांया दिशेने धावलो.

दरम्यान, सध्या पोलीस सेवा कथित चोरांचा तपास करत आहे. पण अजूनही ते चोर भेटलेले नाही. पण सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी लुईस ब्रँटचे कौतूक केले आहे.

महत्वाच्या बातम्या-

माणूस समोर गेला की मनोहरमामा त्याची संपूर्ण माहिती कसं काय सांगायचा? बिंग फुटले
पबमध्ये सुरू असलेला फॅशन शो हिंदूत्ववाद्यांनी गोंधळ घालून बंद पाडला; म्हणाले हा तर लव्ह जिहाद
राम-लखन चित्रपटातील या अभिनेत्रीने पार्टीमध्ये कापून घेतली होती हाताची नस, किस्सा वाचून धक्का बसेल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.