नमाज पढण्यासाठी हिंदू व्यक्तीने दिले दुकान; म्हणाला जागा कमी पडत असेल तर घर, अंगनही देईल

हरियाणापाठोपाठ आता गुजरातमध्येही उघड्यावर नमाज अदा करण्यावरून विरोध सुरू झाला आहे. गुरुग्राममध्ये सुरू असलेल्या निदर्शनांदरम्यान, हिंदू समुदायातील एका व्यक्तीने नमाज अदा करण्यासाठी आपल्या दुकानाची जागा दिली आहे.

दुसरीकडे, अहमदाबादमध्ये वीएचपी सदस्य नमाज अदा केल्यानंतर पार्कच्या शुद्धीकरणासाठी पोहोचले. गुडगावमधील काही रहिवासी आणि राइटविंग विचारसरणीच्या गटांनी उघड्यावर नमाजला विरोध केला असताना अक्षय यादव या व्यक्तीने आपले रिकामे दुकान मुस्लिम समुदायाला नमाजासाठी दिले.

व्यक्तीच्या म्हणण्यानुसार, गेल्या शुक्रवारी येथे किमान १५ लोकांनी नमाज अदा केली होती. अक्षय यादवने सांगितले की, शुक्रवारच्या नमाजात व्यत्यय येत असल्याचे वृत्तपत्रात वाचले होते. त्यानंतर त्यांनी त्यांच्या एका भाडेकरू तौफीक अहमदशी या मुद्द्यावर चर्चा केली.

अक्षय यादव म्हणतात की, “मी त्याला सांगितले की माझ्या घराजवळ एक रिकामे दुकान आहे, ते नमाजासाठी वापरले जाऊ शकते. या भागात मुस्लिम समाजातील लोक मोठ्या संख्येने ऑटो मार्केट आणि जवळपासच्या सर्व्हिस स्टेशनमध्ये काम करतात.

ते पुढे म्हणतात की, मला फक्त समुदायांमध्ये शांतता आणि सद्भावनाची आशा आहे. संविधान म्हणते की प्रत्येक नागरिकाला प्रार्थना करण्याचा अधिकार आहे आणि कोणीही त्यावर आक्षेप घेऊ शकत नाही. गेल्या १२ नोव्हेंबर रोजी राइटविंग संघटनेने सेक्टर १२ ए येथील प्रार्थनास्थळी व्हॉलीबॉल कोर्ट बांधणार असल्याचे सांगत तळ ठोकला होता.

सरहौलमध्ये असताना, 80 हून अधिक आंदोलकांनी एका उद्यानावर कब्जा केला आणि नमाजात व्यत्यय आणला. गुरूग्रामच्या सेक्टर 12 ए च्या साईटची जागा त्या 37 ठिकाणामध्ये आहे जेथे प्रशासनाने नमाज अदा करण्यास परवानगी दिली होती, मात्र गेल्या काही दिवसांपासून काही हिंदू संघटना या जागेवर उघड्यावर नमाज पढण्यास विरोध करत होते.

बऱ्याच वादानंतर अखेर प्रशासनाने या जागेवरून नमाज पठणाची परवानगी मागे घेतली. दुसरीकडे, अहमदाबादमधील वीएचपीचे कार्यकर्ते उद्यानाच्या शुद्धीकरणासाठी पोहोचले जेथे काही लोकांनी नमाज अदा केली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, 16 नोव्हेंबर रोजी विश्व हिंदू परिषदेच्या सदस्यांनी अहमदाबादच्या वस्त्रापूर भागात असलेल्या एका बागेत “शुद्धीकरण विधी” केला. या घटनेच्या व्हायरल व्हिडिओमध्ये काही लोक घोषणाबाजी करताना फुले आणि गंगाजल शिंपडताना दिसत आहेत.

महत्वाच्या बातम्या
समीर वानखेडेंनी आपल्या पहिल्या पत्नीलाही नाही सोडले, मलिकांचा आणखी एक खळबळजनक आरोप
ज्ञानदेव वानखेडे हिंदूच; क्रांती रेडकरने समीर वानखेडेंचा जन्मदाखलाच दाखवला
खरंच मुख्यमंत्री शिवराज सिंहांना मोदींच्या फ्रेममध्ये येण्यापासून रोखलं? जाणून घ्या सत्य..
नावावर ११७ पावत्या तरी बिंधास्त चालवत होता गाडी, पोलिसांच्या तावडीत सापडल्यावर भरावा लागला ‘इतका’ दंड

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.