फेसबुक लाईव्ह सुरु करताच गोळीबार..तरुणाचा जागीच मृत्यू; व्हिडीओ व्हायरल

ब्राझीलमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एक तरुण सलून मध्ये गेला असताना अचानक गोळीबार सुरु झाला. या तरुणाने सोशल मिडियावरती लाईव्ह स्ट्रीमिंग सुरु केले होते. आणि काही अज्ञातांकडून अचानक गोळीबार सुरु झाला.

या घटनेत या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. सलून लुटण्याचा हेतूने हा हल्ला केला गेला होता. मात्र यामध्ये या तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. दरम्यान, सदर घटना ही सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

या घटनेचा व्हिडीओ हा पंचवीस मिलियन लोकांनी पहिला असून, चोरीच्या उद्देशाने काही गनमॅन सलूनमध्ये घुसले. आणि गोळीबार सुरु केला. यामध्ये खुर्चीत बसलेल्या एका तरुणाच्या डोक्यात गोळी घातली आणि तो तरुण जागीच मृत्युमुखी पडला.

या मुलाच्या डोक्यात आणि छातीत गोळया घातल्या आहेत. व्हिडिओच्या आधारे त्या गनमॅनचा तपास सुरू आहे. असाच एक प्रकार कोलंबियामध्ये सुद्धा एकदा घडला आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.