धक्कादायक! शेतकरी आंदोलनातील चार शेतकरी नेत्यांना गोळ्या घालून ठार मारण्याचा कट

मोदी सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी सुरू आहे. या आंदोलनात हिंसाचार घडवून आणण्याचा कट उघडकीस आला आहे. हरियाणाच्या सिंघू सीमेवर शेतकऱ्यांनी एका शूटरला पकडले. तेव्हा हा खुलासा झाला. या शूटरने पोलिसांवरच गंभीर आरोप केले आहेत.

२६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनी निघणाऱ्या ट्रॅक्टर रॅलीमध्ये चार शेतकरी नेत्यांना गोळ्या घालून ठार करण्याची योजना आखण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सिंघू सीमेवर एका शूटरला पकडले आणि चेहरा झाकून त्याला माध्यमासमोर हजर केले असता त्याने हा धक्कादायक दावा केला आहे.

त्या शुटरने सांगितलं की, “आमचा प्लान होता की, जसं शेतकरी ट्रॅक्टर परेड घेऊन दिल्लीत येण्याचा प्रयत्न करतील, तेव्हा दिल्ली पोलीस त्यांना रोखण्याचा विचार करेन. त्यानंतर आम्ही मागच्या बाजूने फायरिंग करु, म्हणजे पोलिसांना वाटेल की, गोळी शेतकऱ्यांच्याच बाजून चालवण्यात आली आहे.”

पुढे हा शुटर सांगतो की, “रॅली दरम्यान, काही लोक पोलिसांच्या वर्दीमध्ये असतील, ते शेतकऱ्यांची गर्दी पसरवण्याचे काम करतील. ज्याने आम्हाला ही जबाबदारी दिली आहे, तो राय पोलिस ठाण्याचा पोलिस अधिकारी आहे.” असाही खुलासा या शुटरने केला आहे.

तसेच “आमच्यासोबत आणखी लोक आहेत. ते पकडले गेलेले नाहीत. आमचे ६० लोक ट्रॅक्टर रॅलीमध्ये सहभागी होतील. ते सर्व पोलिसांच्या वर्दीत असतील, असेही हा शूटर म्हणाला. पैश्यासाठी आम्ही हे काम स्वीकारले आहे.”

बाळासाहेब ठाकरे यांच्या एका धमकीनंतर शाहरुख खानची हवा झाली होती टाईट मग..

क्रूरतेचा कळस! हत्तीच्या अंगावर फेकला पेटलेला टायर, यातना सहन न झाल्याने हत्तीचा मृत्यू

याला म्हणत्यात निष्ठा! शंभर कोटी व मंत्रीपदाची भाजपची ऑफर धुडकावणारा बहाद्दर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.