शोलेच्या शुटींग वेळी अमिताभ धर्मेंद्रसोबत बोलायचं दूर त्यांच्याकडे बघतही नव्हते; कारण..

ये दोस्ती हम नही तोडेंगे’ गाण ऐकल्यानंतर आपल्याला सर्वात पहिले अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्रची आठवण येते. दोघांनी शोले चित्रपटात एकत्र काम केले होते. शोले’ हा बॉलीवुडचा सदाबहार सिनेमा. या चित्रपटातील सवांद, गाणी, कलाकार सगळंकाही हिट होते.

नव्वदीच्या दशकात हा चित्रपट पाहिला नाही असा एकही व्यक्ती नाही. २१ शतकात देखील हा चित्रपट तेवढाच सदाबहार आहे. रमेश सिप्पी यांचे दिग्दर्शन असलेला हा चित्रपट एक अजरामर कलाकृती आहे. हा चित्रपट आजही अनेक प्रेक्षकांच्या काळजात घर करून बसला आहे.

ह्या चित्रपटाच्या अनेक आठवणी अजूनही ताज्या आहेत. अनेकांच्या मनात घर करणाऱ्या या चित्रपटाची जादू कधीच कमी होऊ शकत नाही. कारण हा चित्रपट नेहमीच आठवणींमधून जिवंत असतो.

अमिताभ बच्चन, धर्मेद्र, हेमा मालिनी, जया बच्चन अशी भारी स्टारकास्ट या चित्रपटाची होती. या चित्रपटाचे कलाकार, गाणी, सवांद, पात्र सगळं काही हिट आहे. या सर्वांसोबतच ह्या चित्रपटातील गावही तेवढेच अजरामर आहे.

चित्रपटात अमिताभ आणि धर्मेंद्रने जय विरूची भुमिका निभावली होती. आजही लोकं जय विरुच्या मैत्रीचे किस्से सांगत असतात. चित्रपटात एकमेकांना जीव लावणारे धर्मेंद्र आणि अमिताभ खऱ्या आयुष्यात मात्र चांगले मित्र नव्हते. याचा खुलासा स्वतः धर्मेंद्रने एका मुलाखतीत केला होता.

मुलाखती दरम्यान धर्मेंद्रला शोले चित्रपटाविषयी काही प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी हा खुलासा केला होता. धर्मेंद्रला विचारण्यात आले की, जय विरूची जोडी आजही तेवढीच हिट आहे. तो चित्रपट पाहिल्यानंतर लोकांच्या चेहऱ्यावर हसू येते. तुमच्यासाठी चित्रपट किती खास होता.

यावर धर्मेंद्र म्हणाले की, ‘चित्रपट पाहून लोकांचेहऱ्यावर हसू येत असले तरी शुटींग सुरु असताना मात्र अमिताभ बिलकुल हसत नव्हते. फक्त गाण्यांच्या शुटींग वेळी ते हसले. त्यानंतर मी त्यांच्या चेहऱ्यावर हसू बघितले नाही. प्रत्येकाचा वेगवेगळा स्वभाव असतो’.

धर्मेंद्रने पुढे सांगितले की, अमिताभच्या अगोदर ही भुमिका शत्रूघ्न सिन्हाला ऑफर झाली होती. पण मी या भूमिकेसाठी अमिताभची निवड केली. तो काळ वेगळा होता. त्यानंतर अमिताभ आणि धर्मेंद्रने चुपके चुपके, राम बलरामसारख्या चित्रपटांमध्ये काम केले.

आजच्या परिस्थितीबद्दल बोलायचे झाले तर धर्मेंद्र अमिताभला छोटे भाऊ मानतात. ज्यावेळी अमिताभ कोरोना पॉझिटिव्ह झाले होते. त्यावेळी धर्मेंद्रने त्यांना लवकर बरं होण्यासाठी प्रार्थना केली होती. दोघे आत्ता खुप चांगले मित्र आहेत.

महत्वाच्या बातम्या –

बॉलीवूड सरसावले; अक्षयकुमारची पत्नी ट्विंकल खन्ना थेट लंडनहुन आणणार ऑक्सिजन
हेमामालिनीसोबत किसिंग सीन करणार होते फिरोज खान; पण ‘या’ व्यक्तीने केला कडाडून विरोध
‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्रीचा विवाह झाला संपन्न; पहा लग्नाचे फोटोॉ
‘लव्ह स्टोरी’ फेम अभिनेत्री विजेता पंडितची झाली आहे खुपच वाईट अवस्था; आर्थिक अडचणींचा करत आहे सामना

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.