जाणून घ्या आज काय करते ‘शोले’ चित्रपटातील सांभाचे कुटूंब ?

फिल्म दुनियेमध्ये असे अनेक कलाकार आहेत जे त्यांच्या नकारात्मक भुमिकांमूळे खुप जास्त प्रसिद्ध आहेत. त्यांनी चित्रपटांमध्ये खलनायक बनून प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. चित्रपटांमधील हे खलनायक खऱ्या आयूष्यात मात्र खुपच प्रेमळ आणि साधे असतात.

अशाच एका खलनायकांपैकी एक नाव म्हणजे अभिनेते मोहक मॅकी जानी म्हणजेच रुपेरी पडद्यावरील मॅक मोहन. त्यांनी त्यांच्या कारर्किदीमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. ८० आणि ९० च्या दशकातील अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी खलनायक बनून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

आज मॅक मोहन आपल्यामध्ये नाहीत. १० मे २०१० रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला. पण त्यांचे चित्रपट आजही अजरामर आहेत. त्यांनी त्यांच्या उत्तम अभिनय कौशल्याने अनेक चित्रपट गाजवले आहेत. आजही लोकं त्यांचे चित्रपट पाहतात.

मॅक मोहन आज या जगात नाहीत. पण त्यांच्या आठवणी मात्र नेहमी आपल्यासोबत असतील. ते त्यांच्या चित्रपटांतील भुमिकांमूळे नेहमीच प्रेक्षकांच्या मनात राहतील. १९६४ मध्ये बॉलीवूडमध्ये डेब्यू केल्यानंतर त्यांनी १७५ चित्रपटांमध्ये काम केले होते.

पण त्यांची सर्वाधिक गाजलेली भुमिका आहे शोले चित्रपटातील सांभाची. या भुमिकेने त्यांना खरी ओळख मिळवून दिली होती. याच भुमिकेमूळे त्यांना लोकं आजही आठवतात. मॅक मोहन आज आपल्यामध्ये नसले तरी त्यांचे कुटूंब मात्र आपल्यासोबत आहे. जाणून घेऊया त्यांच्या कुटूंबाबद्दल.

मॅक मोहन यांनी १९८६ मध्ये मिनी मिकी जॅकीसोबत लग्न केले होते. दोघांना तीन मुलं आहेत. मुलगी मंजिरी, विनीता आणि मुलगा विक्रांत. त्यांच्या दोन्ही मुली अभिनय क्षेत्राशी जोडलेल्या आहेत. पण त्यांचा मुलगा मात्र अभिनय क्षेत्रापासून दुर आहे.

मॅक मोहनची मोठी मुलगी आहे मंजिरी त्यांनी अनेक शॉर्ट फिल्मचे निर्माण केले आहे. तर त्यांची दुसरी मुलगी विनीती अभिनेत्री, निर्माती आणि दिग्दर्शक आहे. २०१२ मध्ये रिलीज झालेल्या माय नेम इज खान चित्रपटाच्या आर्ट विभागात तिने काम केले आहे.

त्यांचा मुलगा अभिनयापासून दुर असतो. आज मॅक मोहन आपल्यामध्ये नसले तरी त्यांचे कुटूंब आहे. त्यांच्या दोन्ही मुली दिसायला खुप सुंदर आहेत. त्या सोशल मिडीयावर देखील मोठ्या प्रमाणावर सक्रिय असतात. त्या कुटूंबासोबत अनेक फोटो शेअर करत असतात.

महत्वाच्या बातम्या –

‘सुर्यवंशम’ चित्रपटातील अभिनेत्रीचा शेवट होता अत्यंत वाईट; गरोदर असताना झाला मृत्यू
‘या’ हॉलीवूड अभिनेत्याने केले होते शिल्पा शेट्टीला सगळ्यांसमोर जबरदस्ती किस; प्रकरण गेले कोर्टात
साऊथ इंडस्ट्रीतील ‘या’ अभिनेत्यामूळे ५० वर्षांची तब्बू आजही आहे अविवाहीत
‘लव्ह स्टोरी’ फेम अभिनेत्री विजेता पंडितची झाली आहे खुपच वाईट अवस्था; आर्थिक अडचणींचा करत आहे सामना

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.