‘शोले’ चित्रपटातील जेलर सायकलच्या दुकानात करत होते काम; एका नाटकाने बदलले आयुष्य

बॉलीवूडमध्ये फक्त अभिनेते आणि अभिनेत्रीचं नाही तर चित्रपटातील सगळ्या कलाकारांना खुप जास्त महत्व दिले जाते. कॉमेडी अभिनेते, खलनायक, ज्युनिअर आर्टिस्ट आणि सिनियर आर्टिस्ट सगळे खुप महत्त्वाचे असतात. प्रत्येक कलाकाराची एक वेगळी ओळख आहे.

बॉलीवूडचे असेच एक अभिनेते म्हणजे असरानी. १ जानेवारी १९४१ साली जयपूरमध्ये जन्मलेले असरानी बॉलीवूडचे प्रभावशाली अभिनेते आहेत. त्यांनी त्यांच्या दमदार अभिनय कौशल्याने अनेक वर्षे प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे.

असरानी यांच्या वडीलांचे सायकलचे दुकान होते. त्यांच्या वडिलांची इच्छा होती की, त्यांनी देखील सायकलचे दुकान सांभाळावे. पण असरानी यांना मात्र अभिनय क्षेत्रात रुची होती. म्हणून त्यांनी थोडे दिवस वडिलांसोबत दुकानावर काम केले. त्यानंतर त्यांनी अभिनय क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला.

असरानीने पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये अभिनयाचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी अनेक ठिकाणी ऑडीशन दिले. पण त्यांना काम मिळत नव्हते. म्हणून त्यांनी मुंबईला परत येण्याचा निर्णय घेतला. मुंबईला परत आल्यानंतर त्यांनी अनेक गुजराती नाटकांमध्ये काम केले.

ते वडिलांसोबत सायकलचे दुकान देखील सांभाळत होते. त्यांचे नाटक बघुन त्यांना चित्रपटांच्या ऑफर आल्या. पण त्यांच्या वडिलांचा या गोष्टीला नकार होता. म्हणून त्यांनी वडिलांशी भांडण करून अभिनय क्षेत्रात प्रवेश केला होता. त्या नाटकाने त्यांचे आयुष्य बदलून टाकले होते.

१९६८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हरे काँच की चुडीया’ चित्रपटातून त्यांनी बॉलीवूडमध्ये डेब्यु केला. असरानीला खरी ओळख १९७१ मध्ये रिलीज झालेल्या ‘मेरे अपने’ चित्रपटातून मिळाली होती. या कालावधीत त्यांची ओळख ऋषिकेश मुखर्जीसोबत झाली.

असरानीने त्यांच्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले. त्यावेळी त्यांना समजले की, ‘मुख्य अभिनेता किंवा खलनायक म्हणून त्यांना स्वतः ची ओळख निर्माण करायची नाही. त्यांना यापेक्षा काहीतरी वेगळे करायचे आहे’. म्हणून त्यांनी तसे प्रयत्न सुरू केले.

१९७५ च्या ‘खुशबू’ चित्रपटात त्यांनी अतिशय गंभीर भुमिका निभावली आहे. ७० च्या दशकात त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले. खुप कमी लोकांना माहिती असेल की, त्यांनी अभिनयासोबतच गायन देखील केले आहे. त्यांना संगीताची खुप जास्त आवड होती.

रमेश सिप्पीचा ‘शोले’ चित्रपट त्यांच्या करिअरमध्ये खुप महत्त्वाचा ठरला. या चित्रपटात त्यांनी जेलरची भुमिका निभावली होती. काही मिनिटांच्या या भुमिकेने त्यांचे करिअर बदलून टाकले. त्यांची जेलरची भुमिका आजही अजरामर आहे.

त्यानंतर त्यांनी सलाम मेमसाब, हम नही सुधरेंगे अशा चित्रपटांचे दिग्दर्शन केले. १९९७ च्या ‘उडान’ चित्रपटानंतर त्यांनी दिग्दर्शनाचे क्षेत्र सोडले. २००० नंतरच्या त्यांच्या सगळ्या भुमिका खुप प्रसिद्ध आहेत. त्यांना कॉमेडी अभिनेता म्हणून खुप जास्त पसंत केले गेले.

असरानीने क्यूँ की, वेलकम, भुल भुलैया, बोल बच्चन, बॉडीगार्ड, खट्टा मिट्टा, धमाल, दे दना दन, ढोल, बिल्लू अशा अनेक चित्रपटांमध्ये कॉमेडी भुमिका निभावल्या आहेत. त्यांनी आत्तापर्यंत ४०० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी त्यांच्या प्रत्येक भुमिकेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

माधुरी दीक्षितने बॉलीवूडचा खरा चेहरा आणला समोर; सांगितला ‘हा’ लाजिरवाणा प्रकार

तुमची लाडकी प्राजक्ता माळी ‘या’ मुलासोबत करणार लग्न

‘या’ पाच महागड्या गोष्टींची मालकीन आहे ऐश्वर्या राय बच्चन

‘पडोसन’ चित्रपटातील ‘हा’ अभिनेता रेल्वेमध्ये फुलं विकायचा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.