अर्णब टिआरपीसाठी काय काय घाण धंदे करतो; सोबत काम करणाऱ्यानेच फोडले भांडे

अभिनेता सुशांत सिंह राजपुतचे प्रकरण तापलेले असताना अजून एक माणूस सध्या खूप चर्चेत आहे तो म्हणजे अर्णब गोस्वामी. अर्णब गोस्वामी यांचे रिपब्लिक टीव्ही सध्या टीआरपीमध्ये टॉपला आहे. पण टीआरपीसाठी हा चॅनेल कशाप्रकारे काम करतो याबद्दल एका कर्मचाऱ्याने धक्कादायक खुलासा केला आहे.

संपादक अर्णब गोस्वामी कशाप्रकारे काम करतात याबद्दल त्याने खुलासा केला आहे. २७ ऑगस्टला तेजिंदरसिंह सोधी यांनी रिपब्लिक टीव्हीच्या जम्मू काश्मीरच्या ब्युरोच्या प्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे. त्यात त्यांनी साडेतीन वर्षाच्या कामाच्या अनुभवानंतर पत्रकारितेची हत्या केल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करणारे पत्र लिहिले आहे.

या पत्रात त्यांनी रिपब्लिक टिव्हीबद्दल अनेक खुलासे केले आहेत. हे पत्र ट्विटरवर सध्या व्हायरल होत आहे. तेजिंदरसिंह म्हणाले आहेत की, त्याचे मालक आणि संपादक अर्णब गोस्वामी यांनी त्यांना चॅनेल समाजात दबलेल्यांचा आवाज बनेल याची हमी दिली होती. पण तेजिंदरसिंह यांना लवकरच समजले ते पत्रकारांचा वापर करून घेत आहेत.

अर्णब गोस्वामी यांनी, सुनंदा पुष्कर यांच्या निधनानंतर त्यांच्या वडिलांना घेराव घालून शशी थरूर यांच्याविरोधात बोलण्यास भाग पाडण्यात आले होते. तसेच जम्मू-काश्मीरमधील ब्यूरो चीफ म्हणून त्यांना राज्याचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती यांना लक्ष्य करून त्यांच्याविरूद्ध बोलायलाही सांगितले, असा खुलासाही तेजिंदर यांनी पत्रात केला आहे.

त्यांनी हे देखील कबूल केले की, त्यांनी गोस्वामी यांच्या सांगण्यावरून मुफ्ती यांना देशद्रोहाी आणि विश्वासघातकी म्हणून दर्शविण्यात यावे. न्यूजलॉंड्रीशी झालेल्या संभाषणात तेजिंदर सिंह यांनी कबूल केले की, व्हायरल होत असलेले पत्र हे त्यांनी स्वतः लिहले आहे.

राजीनामा देताना तेजिंदरसिंह रिपब्लिक टीव्हीच्या घरण्याविषयी बोलले. त्यांचा असा दावा आहे की हिंदी आणि इंग्रजी दोन्ही वाहिन्यांच्या कामकाजात अर्णबची पत्नी सौम्यब्रता रे हिचाच जास्त बोलबाला आहे. त्यांची पत्नीच तेथील सुपर एडिटर आणि व्यवस्थापकीय संपादक आहे. तिच्या परवानगीशिवाय तिथले पानही हलत नाही.

पुढे ते म्हणाले की, रिपब्लिक टीव्हीमध्ये त्यांनी जे वातावरण तयार केले ते वृत्तपत्र नसून एक न्यायालय आहे. सामान्यत: एका संस्थेत कनिष्ठ, मध्यम-स्तरीय आणि वरिष्ठ व्यवस्थापक असतात, परंतु अर्नबने बिनाअनुभवी तरुण न्यूजरूममध्ये भरले आहेत. जे कोणत्याही प्रकारे त्याचा विरोध करत नाहीत.

रिपब्लिक टीव्हीच्या सर्वात अनुभवी लोकांनी त्याला सोडले आहे. अर्णबने आपल्या आजूबाजूस निष्ठावंत लोकांचा एक संघ तयार केला आहे. हे सर्वजण अर्णबच्या तालावर नाचतात. या सर्वांची लगाम त्याच्या पत्नीच्या हातात आहे. हे एक छोटं मंडळ आहे जे त्याच्यावर निष्ठा दाखवतात त्यांना अर्णब गोस्वामी बक्षीस देतो.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.