बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंगच्या निधनानंतर मुंबईत अनेक ड्रग्ज ॲगल समोर आले आहेत. अलीकडेच एनसीबीने अनेक हाय प्रोफाइल सेलिब्रिटींची चौकशी केली आहे. आता एनसीबीने बॉलिवूडमधील एक मोठे निर्माता आणि दिग्दर्शकाच्या घरी छापा टाकला.
शनिवारी रात्री उशिरा झालेल्या कारवाईत ड्रग्स आणि रोकड वसूल झाल्यानंतर मोठ्या दिग्दर्शक-निर्मात्याचे नाव समोर आले आहे. एनसीबीने मालाड, अंधेरी, लोखंडवाला, खारघर आणि कोपरखैरणे भागात छापे टाकले. छापे अजूनही सुरू आहेत. अद्याप त्या निर्मात्याचे नाव समोर आले नाही.
एनसीबीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “आम्ही ६ किलो मारिओना आणि मेफेड्रोन हे ड्रग्ज जप्त केले आहेत. ड्रग्ज विक्रेत्यांकडून हे जप्त करण्यात आले आहे. यामध्ये पाच संशयीत ड्रग्ज विक्रेत्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.”
बॉलिवूडमधील ड्रग्जप्रकरणी एनसीबीने अत्तापर्यंत अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींची चौकशी केली आहे. यामध्ये श्रद्धा कपूर, दिपीका पदुकोन, रकूलप्रीत सिंग, सारा अली खान यांचा समावेश आहे.
सुशांतसिंग राजपूत यांच्या मृत्यूशी संबंधित ड्रग्स प्रकरणात एनसीबीने सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती यांना अटक केली. रिया चक्रवर्ती सध्या जामिनावर सुटली आहे, पण तिच्या भावाला जामीन मिळालेला नाही.
अहमदनगरमध्ये उडाली खळबळ! जलसंधारण मंत्र्याच्या घरी सापडला मृतदेह
तरुणपणी त्यांचा साखरपुडा मोडला म्हणुन ब्रम्हचारी राहिले पण कोरोनाने त्यांचे डोळे उघडले
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला केले ‘हे’ आवाहन