पाकिस्तानला जिंकवण्यासाठी शोएब अख्तरचा बाबरला सल्ला; म्हणाला, भारतीय खेळाडूंना झोपेच्या गोळ्या द्या

रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात टी-20 विश्वचषकातील सर्वाधिक व्होल्टेज असलेला सामना रंगणार आहे. दोन्ही देशांचे चाहते या महान सामन्याची उत्सुकतेने वाट पाहत आहे.. चाहत्यांपासून ते दिग्गजांपर्यंत, प्रत्येकजण या सामन्यासाठी त्यांच्या संघांचा उत्साह वाढवण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाही.

पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरनेही आता सामनाआधी एक मोठे वक्तव्य केले आहे. भारतीय संघाला पराभूत करण्यासाठी शोएबने आपल्या टीमला तीन महत्त्वाचे सल्ला दिले आहेत. शोएबच्या मते, या सल्ल्यांचे पालन केल्याने पाकिस्तानचा विजय निश्चित होतो.

टी -२० विश्वचषकात पाकिस्तानचा संघ भारतासमोर विजयासाठी संघर्ष करताना दिसला आहे. गेल्या सहा विश्वचषकांपासून आतापर्यंत दोन्ही संघ पाच वेळा आमनेसामने आले आहेत आणि प्रत्येक वेळी टीम इंडियाला विजय मिळाला आहे. त्याचवेळी, दोन्ही संघांमध्ये खेळल्या गेलेल्या ८ टी-२० सामन्यांमध्ये पाकिस्तानने केवळ एकच सामना जिंकला आहे. रविवारी पाकिस्तान या पराभवाची मालिका संपवण्यासाठी मैदानात उतरेल.

याच पार्श्वभुमीवर पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरने आपल्या टीमला हा सामना जिंकण्यासाठी असे तीन सल्ले दिले आहेत, जे पाहून तुम्हाला तुमचे हसूही थांबवत येणार नाही. तर तुम्हाला भारतीय असल्याचा अभिमानही वाटेल.

शोएब अख्तरने सल्ला देताना म्हटले की, पाकिस्तानने टीम इंडियाच्या खेळाडूंना झोपेची गोळी द्यावी कारण ती खूप मजबूत टीम आहे. माझा दुसरा सल्ला असा आहे की तुम्ही लोक विराट कोहलीला इन्स्टाग्राम वापरण्यापासून थांबवा कारण तो तिथे खूप लोकप्रिय आहे.

तिसरा आणि महत्वाचा सल्ला म्हणजे महेंद्रसिंग धोनीला फलंदाजीला येऊ देऊ नका. मला वाटतं की पाकिस्तानचे संघाने काहीही झालं तरी धोनीला फलंदाजीसाठी उतरून दिलं नाही पाहिजे, कारण धोनी अजूनही आपल्या त्याच फॉर्ममध्ये आहे, असे शोएब अख्तरने म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
कर्णधारपद सोडण्यासाठी विराटवर BCCI चा दबाव? गांगुलीने केलेल्या खुलाश्यातून सत्य आले बाहेर
आर्यन खान प्रकरणात समीर वानखेडेंसोबत झाली 8 कोटींची डील? व्हिडिओमुळे सर्वत्र खळबळ
‘शाहरूख खानने भाजपमध्ये प्रवेश केला, तर ड्रग्सची पिठी साखर होईल’

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.