भारत संकटात आहे, मदतीसाठी दान करा; शोएब अख्तरचे चाहत्यांना व पाकीस्तान सरकारला आवाहन

देशभरात कोरोनाच्या संकटाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरणाला सुरुवात झाली आहे.

तसेच १ मे पासून १८ वर्षांवरील सर्व नागरीकांना कोरोना लस देण्यात यावी, अशा सुचनाही केंद्र सरकारने दिल्या आहे. सध्या भारताची परिस्थिती गंभीर असून औषधं, ऑक्सिजन आणि लसींचा तुडवडा निर्माण होत आहे. त्यामुळे आता पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने लोकांना भारताला मदत करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे.

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यामध्ये त्याने पाकिस्तानी चाहत्यांना भारताच्या मदतीसाठी पुढे या, असे आवाहन केले आहे.

कोणत्याही सरकारला संकटाचा सामना करणे अशक्यच आहे. मी माझ्या सरकारला आणि चाहत्यांना आवाहन करतो की भारताला मदत करा. भारताला सध्या ऑक्सिजन टँकरची गरज आहे. मी सर्वांना विनंती करतो की त्यांनी भारताला निधी मिळवून देण्यासाठी दान करा आणि ऑक्सजन टँक्स त्यांच्यापर्यंत पोहचवा, असे आवाहन शोएब अख्तरने युट्युबवर व्हिडिओ पोस्ट करत केले आहे.

तसेच भारतातील नागरीकांसाठी मी प्रार्थना करतो, परिस्थितीत लवकर सुधारणा होईल, अशी मी अपेक्षा करतो. भारत सरकार नक्की या संकटाचा सामना करेल. या संकटात आपण एकत्र आहोत, असेही शोएब अख्तरने ट्विट करत म्हटले आहे.

दरम्यान, देशात झपाट्याने रुग्णसंख्यामध्ये वाढ होत आहे. शनिवारी कोरोनाचे ३ लाख ४६ हजार ७८६ कोरोना रुग्ण सापडले आहे. एका दिवसातील ही सर्वाधिक रुग्ण संख्या आहे.

महत्वाच्या बातम्या-

भारीच! आता कोरोना काळात हे पाच पेय प्या आणि झटपट आपली रोग प्रतिकारकशक्ती वाढवा
जो बायडन यांच्यावर भारताला मदत करण्याचा दबाव वाढला; युएस चेंबर्सकडून भारताला लस देण्याची मागणी
त्यांना लग्नात खूप अडचणी आल्या, त्यातूनच त्यांनी नवीन व्यवसाय सुरू करून केली करोडोंची कमाई

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.