रियाच्या कॉल डिटेल्समधून धक्कादायक गोष्टी झाल्या उघड; सुशांतसह या लोकांसोबत झालेय बोलणे

 

मुंबई | अभिनेता सुशांत सिंग राजपुतने १४ जूनला वांद्रे येथील राहित्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. मात्र त्याने आत्महत्या का केली? याबाबत अजूनही ठोस कारण मिळालेले नाही.

या प्रकरणी सुशांतचे वडील के के सिंग यांनी अभिनेत्री रिया चक्रवर्ती ही सुशांतच्या आत्महत्येला जबाबदार असल्याचा आरोप केला होता. तसेच पाटणा पोलीस ठाण्यात रियाविरोधात गुन्हादेखील दाखल केला होता.

आता सध्या रियाबाबत सीबीआय चौकशी करत आहे. या सीबीआय चौकशीत अनेक नवनवीन खुलासे होत आहे. आता पुन्हा एक नवा खुलासा झाला आहे.

आता रिया चक्रवर्ती हिचे कॉल डिटेल्स समोर आले असून, महेश भट्ट, सुशांतचे वडील के के सिंह आणि त्याचा मित्र सिद्धार्थ पिठानी याच्याशीही ८ ते १४ जून दरम्यान फोनवर सुशांतशी बोलणे झाले होते, अशी माहिती समोर आली आहे.

रिया चक्रवर्ती हिच्या कॉल डिटेल्समध्ये असे दिसून आले आहे की रियाचे सुशांतच्या वडिलांशी १८ मिनिट १२ सेकंद फोनवरून बोलणे झाले होते.

तसेच तिच्या भावाशी १७ मिनिटे ४९ सेकंद, सुशांत सोबत फक्त २ मिनिट २५ सेकंद, श्रुती मोदीसोबत १३ मिनिट २८ सेकंद, सॅम्युअल मिरांडाशी ४ मिनिटे ४९ सेकंद आणि सिद्धार्थ पिठानीशी १ मिनिट ४० सेकंद फोनवरुन बोलणे झाले होते.

दरम्यान, या डिटेल्समधून रियाचा आणि सुशांतचा फोनवरून खूप कमी संवाद झाला होता हे स्पष्ट झाले. तसेच रियाचे ८ जून रोजी सुशांतसोबत भांडण झाले होते. यानंतर रियाने घर सोडले होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.