धक्कादायक! DJ च्या कर्णकर्कश आवाजाने घेतला अडीच वर्षांच्या चिमुरड्याचा जीव; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

बिलासपुर। आजकाल कोणताही छोटा मोठा कार्यक्रम असो त्यात नाचगाणं हे सर्वात महत्वाचे आहे. अगदी वाढदिवसा पासून ते लग्न सोहळयापर्यंत सर्वच सण संभारंभात मोठ्या आवाजात स्पीकरवर किंवा डीजेवर गाणी वाजवली जातात.

मात्र या डीजेच्या कर्कश आवाजामुळे अनेकांना त्रास होत असतो. अशीच एक धक्कदायक घटना सध्या समोर आली आहे. डीजेच्या आवाजामुळे एका लहानग्याचा मृत्यू झाला असून सर्वत्र परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना छत्तीसगडमधील बिलासपुर जिल्ह्यात बेनिनगर या गावातील आहे.

या गावात राहणाऱ्या कलीम अंसारी यांचा अडीच वर्षांचा मुलगा जन्मापासून प्लास्टिक एनीमिया या आजाराने ग्रस्त होता. या चिमुकल्यावर वेल्लूरमध्ये औषध उपचार सुरु होते. उपचारासाठी त्याला दवाखान्यात घेऊन जावं लागत असे.

5 सप्टेंबर रोजीही मुलाला उपचारासाठी वेल्लूरला घेऊन जाण्याची तयारी सुरू होती. मात्र त्याआधी 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरच्या दरम्यान तो राहतो त्या भागात धार्मिक यात्रा काढण्यात आली होती. व या यात्रेत डीजेचा उपयोग करण्यात आला होता. व त्या डिजेच्या मोठ्या आवाजामुळे मुलाचा मृत्यू झाला आहे.

मुलाचा मृत्यू डिजेच्या मोठ्या आवाजामुळे झाला असल्याचे कुटुंबीयांनी आरोप केला आहे. कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार डीजेच्या मोठ्या आवाजामुळे अमानची प्रकृती बिघडली आणि काही वेळात त्याचा मृत्यू झाला. येत्या काळात ते आपल्या मुलाच्या नावावर एका फाऊंडेशची तयारी करीत आहे.

ज्याअंतर्गत या आजाराच्या लोकांना मदत मिळू शकेल. कलीम अंसारी म्हणाले की, त्यांनी आपल्या मुलाला गमावलं आहे. मात्र पुन्हा डीजेमुळे कोणाच्याही घरात शोककळा पसरू नये हीच आशा आहे.

या घटनेनंतर चिमुरड्याच्या वडिलांनी मृत्यूच्या काही दिवसंनंतर बिलासपूरचे कलेक्टर आणि एसपी यांची भेट घेतली. आणि भलामोठा आवाज करणाऱ्या डीजेच्या सिस्टमचं डेसिबल ठरविण्यात यावा. जेणेकरून पुन्हा कोणाला याचा त्रास होणार नाही.
महत्वाच्या बातम्या
फी भरायला नव्हते पैसे, आईने ठेवले घर गहाण, पोराने IAS होऊन केले नाव.. 
धोनीच्या निवडीमुळे संघात वाढू शकतो तणाव, सुनील गावसकरांनी सांगितले ‘ते’ कारण.. 
लष्करातील मराठा लाईट इन्फंट्रीत मिळणार बाल पैलवानांना संधी; ‘या’ तारखेला होणार मेगाभरती
पुणे पोलिसांची राणे कुटुंबाविरोधात मोठी कारवाई; कुठे जाणार, कुठून आले? यावर पोलिस ठेवणार नजर, जाणून घ्या प्रकरण

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.