“केरळमधील लोक सुशिक्षित आहेत, म्हणून भाजपला मतदान करत नाहीत” भाजप आमदाराचे धक्कादायक वक्तव्य

नवी दिल्ली | देशातील केरळ, तमिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम या चार राज्यात आणि पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशात निवडणूक होणार आहे.  निवडणूकीत काँग्रेस, भाजपसह अनेक स्थानिक पक्ष निवडणूकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. अशातच केरळमधील भाजपचे नेते आणि आमदार ओ राजगोपाल यांनी पक्षाविरोधातचं धक्कादायक विधान केलं आहे.

इंडियन एकस्प्रेस वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ओ राजगोपाल म्हणाले, “भाजप केरळमध्ये पुढे चालला आहे. केरळमध्ये 90 टक्के जनता साक्षर आहे. त्यामुळे लोक भाजपला मतदान करत नाहीत. राज्यातील लोक विचार करणारे आहेत. शिक्षित लोकांच्या या सवयी आहेत.”

पुढे म्हणाले, राज्यात 55 टक्के लोक हिंदू आहेत, तर 45 टक्के अल्पसंख्यांक आहेत. त्यामुळे केरळची तुलना इतर राज्यांशी केली जाऊ शकत नाही. येथील परिस्थीती वेगळी आहे. पण आम्ही चांगलं करण्याचा प्रयत्न करतोय.” असं भाजप नेते राजगोपाल यांनी म्हटलं आहे.

भाजपच्या नेत्याच्या या वक्तव्याने विरोधी पक्षांना टीका करण्याची चांगलीच संधी सापडली आहे. काँग्रेसने ट्विट करत म्हटलं की भाजप खोटं बोलतोय हे संपुर्ण देशाला माहित होत आहे. भाजपने लोकांना जे स्वप्न दाखवलं होतं. त्या पध्दतीने भाजप काम करत नाही. फक्त केरळचं नाही. संपुर्ण देश भाजपला मतदान करणार नाही.

 

दरम्यान केरळमध्ये 140 जागांसाठी 6 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री भाजप नेते अमित शाहा स्वत:  प्रचाराला उतरले आहेत. भाजपला या निवडणूकीत कितपत यश मिळते. हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
कोण अमिताभ बच्चन? म्हणत राजेश खन्नाने केला होता अमिताभचा अपमान
सुप्रीम कोर्टात गेलेले परमबीरसिंग तोंडावर आपटले; कोर्टाने दिला ‘हा’ आदेश
मोदी सरकारच्या या योजनेमुळे एप्रिलपासून तुमचा पगार कमी होण्याची शक्यता
परमबीर सिंग यांची प्रॉपर्टी किती, जनतेला कळू द्या; राष्ट्रवादीची मोठी मागणी

 

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.