शीतल आमटे आत्महत्या प्रकरणात धक्कादायक माहिती उघड, पोलीस आता ‘या’ पद्धतीने करणार तपास..

काही दिवसांपूर्वीच महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ. शीतल आमटे यांनी आत्महत्या केली. यामुळे राज्यासह देशातील अनेकांना मोठा धक्का बसला. आता या प्रकरणाचा सर्वअंगाने पोलीस तपास करत आहे. आतापर्यंत या प्रकरणी 16 जणांचा जबाब नोंदवला आहे.

ही आत्महत्या आहे की अजून काय याबाबत पोलीस आता तपास करत आहेत. शीतल आमटे यांच्याशी नजीकच्या काळात संभाषण झालेल्या 90 टक्के लोकांची चौकशी पूर्ण झाली आहे. अजून पोलीस तपास करत आहेत.

आतापर्यंत करण्यात आलेल्या तपासात डॉ. शीतल आमटे यांनी विषारी इंजेक्शन घेत आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती आहे. पण नेमके विष कोणते होते याबाबतचा खुलासा पोस्टमोर्टमच्या सविस्तर अहवालात स्पष्ट होणार आहे. मात्र प्राथमिक पोस्टमोर्टम अहवाल पोलिसांनी जाहीर केला नाही. यामुळे ती माहिती अजूनही उघड झाली नाही.

शीतल आमटे यांचा घातपात तर झाला नाही ना, या दृष्टीने पोलीस शक्यता पडताळून पाहत आहे. आत्महत्येपूर्वी शीतल आमटे यांनी कुणाशी संवाद साधला, त्यांना कुणाचे फोन आले, त्यांना कोण-कोण भेटले अशी माहिती पोलीस गोळा करत आहे. शीतल आमटे या मानसिक तणावाखाली होत्या, त्यामागचे कारण काय होते, याचा तपासही पोलीस करत आहे.

शीतल यांचा लॅपटॉप-टॅब-मोबाईल नागपूरच्या फॉरेन्सिक पथकाने ताब्यात घेत मुंबईतील IT तज्ज्ञांकडे पाठविला आहे. डॉ. शीतल यांनी या गॅजेटचे पासवर्ड नुकतेच बदलले होते व याची माहिती कोणालाही नव्हती. यामुळे तपास खुंटला आहे. त्यांच्या पतीला देखील याबाबत माहीत नव्हती.

यापैकी काही गॅजेटमध्ये डॉ. शीतल यांनी स्वतःचे डोळे पासवर्ड ठेवला असल्याने प्रक्रिया अवघड झाली आहे. डॉ. शीतल यांचे नोकर आणि घरगुती मदतनीस यांची चौकशी करण्यात आली आहे. आता पोलीस अजून तपास करत असून अनेकांची चौकशी सुरू आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.