सुशांतच्या बेडरूमचे कुलूप तोडणाऱ्याने केले धक्कादायक खुलासे; म्हणाला कुलूप तोडले आणि…

मुंबई | सुशांत सिंह राजपुतच्या आत्महत्येला २ महिन्यापेक्षा जास्त काळ उलटून गेला तरीही पोलिसांना त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण सापडले नाही. आता ही केस सीबीआयकडे देण्यात आली आहे. मात्र या केसमध्ये काही दिवसांपासून अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत.

या प्रकरणातील महत्वाचा साक्षीदार म्हणजे ज्याने सुशांतच्या बेडरूमचे कुलूप तोडले तेव्हा त्याला तिथे काय काय दिसले याचा खुलासा केला आहे. एबीपी माझाला त्याने मुलाखत दिली आहे. तो म्हणाला की, मला सिद्धार्थ पिटाणीने गूगलवरून माझा नंबर घेऊन फोन केला होता.

त्याने मला फोनवर सांगितलं की, एक माणूस आहे जो घरात आतमध्ये झोपलेला आहे मात्र तो दरवाजा उघडत नाहीये, तुम्ही लवकर येऊन दरवाजा खोलून द्या. त्यांनी मला पत्ता पाठवला आणि मी दिलेल्या पत्त्यावर पोहोचलो.

तिथे गेल्यावर मी त्यांना परत फोन केला तेव्हा ते म्हणाले सहाव्या मजल्यावर ये. मी घरात गेल्यावर त्यांनी मला वरती नेले कारण सुशांतचा फ्लॅट डुप्लेक्स होता. मला त्यांनी लॉक दाखवले. ते लॉक कम्प्युटराईज होते. मी माझ्या बॉक्समधल्या चावीने प्रयत्न करत होतो पण त्यांनी मला सांगितले हे लॉक तोडावे लागेल.

मी जेव्हा हातोडी आणि स्क्रू ड्रायव्हरने ते फोडत होतो तेव्हा खूप आवाज होत होता तेव्हा मला सिध्दार्थ पटाणी आणि इतर लोक थांबवत होते. मला म्हणायचे थांब आणि दरवाजाला कान लावून ऐकायचे परत म्हणायचे आता फोड. त्यांनी मला सांगितले होते आतून आवाज आला तर काम थांबवावे लागेल.

अखेर मी लॉक तोडले ते तोडायला मला सात ते आठ मिनिटे लागली असतील. लॉक तुटल्यावर मी हॅन्डलला धरून दरवाजा खोलायला लागलो तर त्यांनी मला थांबवले आणि ठरल्याप्रमाणे २००० रुपये देऊन परत पाठवले. नंतर मी तेथून निघून गेलो.

१ तासानंतर मला पोलिसांचा सिद्धार्थच्या फोनवरून कॉल आला. पोलीस म्हणाले आता तू जिथे लॉक तोडले तिथे परत ये. मी पुन्हा तिथे गेलो. मी जेव्हा तिथे गेलो तेव्हा ४ ते ५ जण उभे होते. मला त्यांच्या हवभावावरून वाटत नव्हते की ही हत्या आहे. कारण सगळे जण नॉर्मल होते. मला तिथे काहीही संशयास्पद वाटले नाही.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.