सुशांत प्रकरणावर मुंबईतील वरिष्ठ वकिलांचा धक्कादायक खुलासा; म्हणाले…

 

मुंबई | बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतचा १४ जूनला वांद्रेच्या राहत्या घरी मृतदेह आढळून आला होता. पोलीस तपासात त्याने आत्महत्या केल्याची म्हटले जात आहे, मात्र त्याने आत्महत्या का केली? हे अद्यापही स्पष्ट झाले नाही.

सुशांतच्या प्रकरणाचा तपास आता सीबीआय करत आहे. तसेच या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहे, आता मुंबईतील वरिष्ठ वकील अशोक सरोवगी यांनी मोठा खुलासा केला आहे.

सुशांत सिंग राजपूत बॉलिवूड सोडणार होता असा धक्का खुलासा अशोक सरोवगी यांनी केला आहे. या संदर्भात सुशांतने वकिलांसोबत चर्चा केली होती, असेही अशोक सरोवगी यांनी म्हटले आहे.

सुशांत बॉलिवूड सोडण्याच्या विचारात होता. यासाठी त्याने मिटिंग घेतली होती, या मिटिंगमध्ये सुशांतने त्याचे वकील, सीएसहित रिया चक्रवर्ती आणि आणखी तीन जण होते, या मिटींगची रेकॉर्डिंग केली असून ती ईडीकडे आहे, असेही अशोक सरोवगी यांनी म्हटले आहे.

तसेच अशोक सरोवगी यांनी ही रेकॉर्डिंग सार्वजनिक करण्यात यावी अशी मागणीही केली आहे. ईडी सध्या सुशांतच्या प्रकरणात मनी लॉंड्रीवर तपास करत आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.