Share

बॉलीवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा; म्हणाली, ‘काकांनी माझ्या मांडीला…’

‘सेक्रेड गेम्स’ वेबसिरीजमध्ये कुक्कुची भूमिका साकारलेली अभिनेत्री कुब्रा सैतने(Kubra Sait)आपल्यावर लैंगिक शोषण झाल्याचा खुलासा केला आहे. अभिनेत्री कुब्रा सैतने तिच्या ‘ओपन बुक: नॉट क्वाएट अ मेमॉइर’ या पुस्तकात यासंदर्भातील अनुभव शेअर केला आहे. वयाच्या १७ व्या वर्षी अभिनेत्री कुब्रा सैतच्या काकांनी तिचे लैंगिक शोषण केल्याचे या पुस्तकात सांगितले आहे. (Shocking revelation of famous Bollywood actress)

कुटुंबाला त्रास होऊ नये म्हणून तब्बल अडीच वर्षे अभिनेत्री कुब्रा सैत हे निमूटपणे सहन करत होती. अभिनेत्री कुब्रा सैतने या पुस्तकात सांगितले आहे की, “एकदा आई-वडील, भाऊ आणि मी बंगळुरूमधील एका रेस्टॉरंटमध्ये गेले होतो. त्यावेळी रेस्टॉरंटचा मालक असलेल्या व्यक्तीशी आमची ओळख झाली. त्यानंतर आम्ही आठवड्यातून एकदा त्यांच्या रेस्टॉरंटला जायचो.”

“त्यांच्यासोबत आमचे कौटुंबिक नाते तयार झाले. मी त्यांना काका म्हणायचे. एकदा माझे कुटुंब आर्थिक संकटातून जात होते. माझी आई खूप अस्वस्थ होती आणि रडत होती. त्यावेळी त्या काकांनी माझ्या आईला मदत केली. त्या काकांनी आम्हाला काही पैसे मदत म्हणून दिले. त्यामुळे आमच्यावर आलेले आर्थिक संकट काही प्रमाणात कमी झाले.”, असे अभिनेत्री कुब्रा सैतने पुस्तकात सांगितले आहे.

अभिनेत्री कुब्रा सैतने पुस्तकात पुढे सांगितले आहे की, “एके दिवशी आम्ही सगळे गाडीत बसलो होतो. त्यावेळी काकांनी माझ्या ड्रेसमध्येच हात टाकला आणिहसू लागले. त्यावेळी मी सुन्न झाले होते. ते सतत आमच्या घरी यायचे. माझी आई त्यांच्यासाठी जेवण बनवायची. ते माझ्या आईसमोर माझ्या गालाचे चुंबन घ्यायचे.”

“एके दिवशी माझ्या आईचे आणि बाबांचे पैशांवरून भांडण झाले. त्यावेळी मी त्या काकांना फोन केला आणि घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यावेळी त्यांनी मला पैशांची मदत करतो असे सांगितले. त्यांनतर ते मला एका हॉटेलमध्ये घेऊन गेले. त्यांनी सर्वात प्रथम माझ्या माझ्या ओठांवर चुंबन केले. यावेळी मी फार गोंधळली होते. माझ्यासोबत काय होत आहे ते मला समजले नाही”, असे कुब्रा सैतने पुस्तकात सांगितले आहे.

“त्यावेळी मी पळून जाण्याचा किंवा ओरडण्याचा विचार करत होते. पण मी काहीच करू शकले नाही. त्यानंतर त्या काकांनी माझी पॅन्ट उघडली. त्यावेळी माझ्यासोबत काय घडत आहे, ते मला समजत नव्हते. पण मी माझी व्हॅर्जिनिटी गमावत होते. हा माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट क्षण होता”, असे देखील कुब्रा सैतने पुस्तकात सांगितले आहे.

अभिनेत्री कुब्रा सैतने पुस्तकात पुढे सांगितले आहे की, “तो व्यक्ती माझ्यावर अडीच वर्षे लैंगिक अत्याचार करत होता. एके दिवशी मुंबईहून पुण्याला येत असताना ही सर्व घटना मी माझ्या आईला सांगितली. ही घटना एकूण माझी आई भावुक झाली आणि तिने माझी माफी मागितली”, असे कुब्रा सैतने पुस्तकात लिहिले आहे.

महत्वाच्या बातम्या :-
सिद्धू मुसेवाला प्रकरणात समोर आलं ‘पुणे कनेक्शन’, ८ शुटर्सची ओळख पटली, वाचून धक्का बसेल
‘अरंगेत्रम’ कार्यक्रमात थिरकली अंबानींची होणारी सुन, नृत्य पाहून सेलिब्रीटीही झाले घायाळ, पहा व्हिडीओ
उडत्या विमानात दोन भावांनी एकमेकांवर केली लघवी, त्रासलेल्या पायलटनं उचललं धक्कादायक पाऊल

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now