सुशांतच्या रुममेटने केले फ्लॅटच्या घडामोडींपासून रियाच्या नात्यापर्यंत धक्कादायक खुलासे

मुंबई | बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतचा १४ जूनला वांद्रेच्या राहत्या घरी मृतदेह आढळून आला होता. पोलीस तपासात त्याने आत्महत्या केल्याची म्हटले जात आहे, मात्र त्याने आत्महत्या का केली? हे अद्यापही स्पष्ट झाले नाही.

सुशांतच्या प्रकरणाचा तपास आता सीबीआय करत आहे. तसेच या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहे. आता सीबीआयने सुशांत मित्र आणि रूममेट सिद्धार्थ पिठाणीची चौकशी केली आहे.

सिद्धार्थ हा सुशांतचा रूममेट असल्याने तो सुशांतच्या घरीच राहत होता. तसेच ज्या दिवशी सुशांतचा मृत्यू झाला त्या दिवशीही सिद्धार्थ सुशांतच्या घरीच होता त्यामुळे सीबीआयने त्याची कसून चौकशी केली आहे.

तू कधी पासून सुशांतला ओळखतो असा प्रश्न सीबीआयने विचारला असता, मी एप्रिल २०१९ पासून सुशांतचा रूममेट आहे. असे उत्तर सिद्धार्थने दिले आहे.

तसेच रियाने घर कधी सोडले आणि का सोडले हे विचारले असता, त्यावर सिद्धार्थ म्हणाला, रियाने घर ८ जूनला सोडले पण रियाने घर का सोडले हे माहित नाही.

तिने घर सोडताना, सुशांतची काळजी घे, मी एका फोनच्या अंतरावर आहे काही अडचण आल्यास फोन कर, एवढे रियाने मला सांगितले होते, असे सिद्धार्थने म्हटले आहे.

तसेच सुशांत आणि रियामध्ये काही वाद होते का? असा प्रश्न सीबीआयने विचारला असता, मला माहित नाही ते वरच्या मजल्यावर राहत होते, असे उत्तर सिद्धार्थने दिले.

तसेच सुशांतला कुठला आजार होता का? असा प्रश्न विचारला असता, मला त्याबद्दल काहीही माहीत नाही, पण तो गोळ्या औषध घ्यायचा असे सिध्दार्थने यावेळी म्हटले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.