धक्कादायक! पुण्यातील ‘ही’ बँक झाली कोरोनाची हॉटस्पॉट; १० कर्मचाऱ्यांना बाधा

पुणे | पुणे जिल्ह्यात प्रसिध्द असलेल्या राजगुरुनगर सहकारी बँकेतील २ शाखांमधील ८ कर्मचारी आणि २ संचालक असे एकूण १० जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. यामुळे राजगुरूनगर सहकारी बँक कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहे.

१९ जून रोजी राजगुरूनगर  येथील नवीन वास्तुच्या उद्घाटन सोहळ्या दरम्यान मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती. त्यावेळी सोशल डिस्टन्सिंग, मास्क कोणीही वापरले नाही. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग झाल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, मंचर व नारायणगाव परिसर कंटेन्मेंट झोन करण्यात आले आहे. त्यामुळे राजगुरुनगर सहकारी बँकेच्या मंचर व नारायणगाव शाखा पुढील आदेश येई पर्यत बंद ठेवण्यात येणार आहेत.

बँकेच्या १० कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने, त्या कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी स्वतःहुन पुढे येऊन आपली कोरोना तपासणी करुन घ्यावी. असे आवाहन बँकेच्या वतीने करण्यात आले आहे.

कोरोना महामारीच्या काळात या बँकेचे कर्मचारी सेवा देत होते. मात्र हि सेवा देत असताना पाईट व राजगुरुनगर येथील बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.