झारखंडमधून(Zarkhand) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. देवघर येथील त्रिकूट टेकडीवर रोपवेच्या ट्रॉलींची एकमेकांना धडक झाली आहे. या घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. रविवारी संध्याकाळी पाच वाजता ही घटना घडली आहे. अजून देखील ४८ लोक रोपवेच्या ट्रॉलीमध्ये अडकले आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.(Shocking photos of Jharkhand ropeway accident)
रोपवेच्या ट्रॉलीमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफ पथकाची मदत घेण्यात आली आहे. तसेच लष्कराची देखील मदत घेण्यात आली आहे. सध्या या परिसरात लष्कराकडून बचावकार्य सुरू आहे. या घटनेत जखमी झालेल्या पर्यटकांना देवघर रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रामनवमी निमित्त अनेक पर्यटक देवदर्शनासाठी देवघर टेकडीवर आले होते. यावेळी रोप वे सुरु असताना तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे केबल कारची टक्कर झाली. यात एक रोपवे ट्रॉली दुसऱ्या रोपवे ट्रॉलीला धडकली. या अपघातात अनेक जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर रोपवे व्यवस्थापक आणि इतर कर्मचारी घटनास्थळावरून पळून गेले आहेत.
हवाई दलाचे हेलिकॉप्टर बचावकार्यासाठी घटनास्थळी सकाळीच पोहचले आहेत. पण हेलिकॉप्टरच्या पंख्याच्या जोरदार वाऱ्यामुळे बचावकार्यात अडथळा येत आहे. तब्बल २० तास झाले लोक रोपवेच्या ट्रॉलीत अडकून पडले आहेत. काही लोकांना बाहेर काढण्यात यश आलं आहे. लष्कर आणि एनडीआरएफ पथक रोपवेच्या ट्रॉलीमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
ड्रोनच्या सहाय्याने रोपवेच्या ट्रॉलीमध्ये अडकलेल्या लोकांना अन्न आणि पाणी दिले जात आहे. रोपवेच्या ट्रॉलीमध्ये अनेक लहान मुले देखील अडकले आहेत. देवघरचे उपायुक्त मंजुनाथ भजंत्री यांनी या घटनेची माहिती दिली आहे. उपायुक्त मंजुनाथ भजंत्री म्हणाले की, “बचाव कार्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे पथक घटनास्थळी तैनात करण्यात आले आहे. तसेच स्थानिक लोक देखील एनडीआरएफला बचाव कार्यात मदत करत आहेत.”
देवघरचे उपायुक्त मंजुनाथ भजंत्री यांनी लोकांना अफवा पसरवू नका असे आवाहन केले आहे. “परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. रोपवेवर केबल कारमध्ये अजूनही काही लोक अडकले असून त्यांची सुटका करण्यात येत आहे. सर्व पर्यटकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात येत आहे”, अशी माहिती देवघरचे उपायुक्त मंजुनाथ भजंत्री यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या :-
ST कामगारांचा उद्रेक समर्थनीय नसला तरी त्यांच्यावर ही वेळ का आली? प्रसिद्ध दिग्दर्शकाची पोस्ट व्हायरल
मद्यधुंद खेळाडूने चहलला 15 व्या मजल्यावरील बाल्कनीत लटकावले, घटनेबाबत कळताच रवी शास्त्रींचा उडाला संताप, म्हणाले…
‘2 स्टेट्स’ मधून आपल्या अभिनयाने भुरळ घालणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्याने घेतला अखेरचा श्वास