धक्कादायक! मोदी जिंदाबाद न म्हणणाऱ्या मुस्लिम रिक्षा चालकास बेदम मारहाण

 

सिकार | राजस्थानमधील सिकार जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली असून मोदी जिंदाबाद आणि जय श्रीराम च्या घोषणा न केल्यामुळे, एका ५२ वर्षीय रिक्षा चालकास बेदम मारहाण करण्यात आली आहे.

रिक्षा चालकाचे नाव गफ्फार अहमद कच्छवा आहे. शुक्रवारी पहाटे प्रवाशाला सोडून गफ्फार परत येत होते. तेव्हा परत असताना एका कारमध्ये काही तरुणांनी गफ्फार यांना तंबाखू मागितली.

मात्र गफ्फार यांनी तंबाखू दिली असता, त्यांनी घेण्यास तरुणांनी नकार दिला. तसेच गफ्फार यांना मोदी जिंदाबाद आणि जय श्रीरामच्या घोषणा देण्यास सांगितल्या. मात्र गफ्फार यांनी घोषणा देण्यास साफ नकार दिला.

त्यानंतर एका तरुणाने गफ्फार यांच्या कानशिलात मारली. गफ्फार यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला असता तरुणांनी त्यांना जगमालपुरा येथे गाठले व त्यांना पुन्हा घोषणा देण्याबद्दल सांगितल्या.

तसेच त्या तरुणांनी गफ्फार यांचे पाकिट, घड्याळ व ७०० रु. काढून घेतले. सोबत त्यांची दाढी ओढली, त्यांना लाथा आणि बुक्क्या मारण्यास सुरूवात केली. यात गफ्फार यांचे तीन दात पडले आहे. तसेच डाव्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली केली आहे.

दरम्यान, गफ्फार यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. त्यांनतर पोलिसांनी याबाबत दोन तरुणांना अटक केली आहे. या दोघांनी मद्यप्राशन केल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.