धक्कादायक ! लेस्बियन पत्नीने केला पतीचा खून मग इलेक्ट्रॉनिक ग्राइंडरने केले तुकडे

जोधपूर | जोधपूरमध्ये समलैंगिक संबंध असणाऱ्या एका लेस्बियन पत्नीने आपल्या नवऱ्याचा इलेक्ट्रॉनिक ग्राइंडरने तुकडे करून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तिने आपल्या नवऱ्याला मारण्याचा कट रचला होता. समलैंगिक संबंधामुळे तिला आपल्या सासरी जायचे नव्हते.

कृषी विभागाचे अधिकारी असलेले चरण सिंह यांच्या पत्नीने स्वतःच्या बहिणींसोबत मिळून चरण सिंह यांची हत्या केली. हत्या केल्यानंतर त्यांनी त्याचे तुकडे करून नाल्यामध्ये फेकून दिले. पाचही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

कोर्टात त्यांना सादर केल्यानंतर पोलिसांनी कोर्टाला दिलेल्या माहितीनुसार सांगितले आहे की, अजूनही हत्येसाठी वापरलेले समान त्यांना मिळालेले नाही ते त्याचा शोध घेत आहेत. म्हणून आरोपींना ५ दिवस पोलीस रिमांडमध्ये ठेवणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार कृषी विभागाचे अधिकारी असलेले चरण सिंह यांची पत्नी सीमा व तिच्या बहिणी बबिता, प्रियांका आणि एक त्यांचा मित्र असलेला भियाराम जाट या सर्वांनी मिळून चरण सिंह यांची हत्या केली.

यानंतर इलेक्ट्रॉनिक ग्राइंडरने त्यांच्या शरीराचे तुकडे तुकडे केले आणि नाल्यामध्ये फेकून दिले. यानंतर शहरात खूप दहशत पसरली होती. दरम्यान, चरण सिंह यांची पत्नी सीमा हिचे एका दुसऱ्या महिलेसोबत समलैंगिक संबंध होते. त्यामुळे ती सासरी जात नव्हती.

त्यांच्या लग्नाला खूप दिवस झाले होते पण त्यांच्यात लैगिंक संबंध जुळले नव्हते त्यामुळे चरण सिंह यांनी सीमाला सासरी घेऊन जायचे ठरवले. पण सीमाला सासरी जायचे नव्हते आणि चरण सिंह तिच्यावर लैगिंक संबंधासाठी खूप दबाव टाकत होते.

समाज काय बोलेल या भीतीने तिने चरण सिंह यांना ती लेस्बियन असल्याचे सांगितले नव्हते. त्यानंतर तिने असे धक्कादायक पाऊल उचलले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.