‘धक्कादायक; जव्हार येथील काळमांडवी धबधब्यात सेल्फीच्या नादात पाच मुले बुडाली’

*’धक्कादायक; जव्हार येथील काळमांडवी धबधब्यात सेल्फीच्या नादात पाच मुले बुडाली’

पालघर | जव्हारपासून सात किमी अंतरावर केळीचा पाडा (काळशेती) येथील धबधब्यावर  फिरायला गेलेल्या पाच तरुण मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.

धबधब्यावर मुले गेली असता तिथे सेल्फी काढताना आधी २ मुले पाण्यात पडली. त्यांना वाचवण्यासाठी इतर मुलांनी पाण्यात उडी घेतली.

मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने यातील पाच जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. यानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आली. ही सर्व घटना दुपारच्या सुमारास घडली आहे.

तसेच पुढील योग्य त्या कारवाईसाठी ती मृतदेह कुटीर हॉस्पिटल जव्हार येथे आणण्यात आली आहे. ही सर्व मुले जव्हार येथील अंबिका चौक या भागातील निवासी होते.

निमेश नरेंद्र पटेल (३० वर्षे), जय अतुल भोईर (२१ वर्षे), प्रथमेश प्रकाश चव्हाण (१८ वर्षे), देवेंद्र गंगाधर वाघ (२४ वर्षे), देवेंद्र दत्तात्रय फलटणकर (२१) ही बुडालेल्या तरुण मुलांची नावे आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.