धक्कादायक! परीक्षा पडली महागात, तब्बल 32 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

कोरोनामुळे देशातील रुग्णसंख्येने आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. परीक्षा दिल्यानंतर तब्बल 32 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचा प्रकार घडला आहे.

कोरोनामुळे मार्च महिन्यापासून शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळा-महाविद्यालय बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कर्नाटक बोर्डाने काही दिवसांपूर्वी SSLC च्या परीक्षा घेतल्या. ही परीक्षा दिलेल्या तब्बल 32 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. विद्यार्थ्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

कर्नाटकामध्ये आठ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. 25 जून पासून ही परीक्षा सुरू झाली होती. मात्र परीक्षा देऊन आलेल्या 32 विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोरोनामुळे मुलांचे आरोग्य धोक्यात येत आहे. अशा शाळांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील होत आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.