भाजप उमेदवाराच्या गाडीत सापडले ईव्हीएम; निवडणूक आयोगावर देशभरातून टिकेचा भडीमार

मुंबई : आसाममध्ये गुरुवारी दुसऱ्या टप्प्यातील ३९ जागांसाठी मतदान घेण्यात आले. या दिवसभरातील मतदान प्रकियेनंतर भाजपा उमेदवाराच्या कारमध्ये ईव्हीएम मशिन आढळून आल्याची घटना उघडकीस आली आहे. यासंदर्भात काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनीही ट्विट केलं आहे.

दुसऱ्या टप्प्यातील मतदानानंतर एक व्हिडीओ समोर आला. ज्यात एका गाडीमध्ये ईव्हीएम मशीन आढळून आले. महत्त्वाचं म्हणजे ज्या गाडीत ईव्हीएम मशील सापडले ती गाडी भाजपा उमेदवाराची असल्याची माहिती मिळाली आहे. याप्रकरणी भाजपावर टीका होतं असून निवडणूक आयोगाकडे कारवाईची मागणी केली आहे.

दरम्यान, या घटनेची चर्चा सुरू झाल्यानंतर निवडणूक आयोगाने यावर खुलासा केला आहे. “ज्या कारचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ती कार भाजपा उमेदवार कृष्णेंदू पाल यांची आहे. पाल पाथरकांडी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.

कारचा नंबर AS 10 B 0022 असून या कारमधील ईव्हीएम मशिनचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. काँग्रेस आणि एआययुडीएफने हे प्रकरण अतिशय गंभीर असल्याचं सांगत, निवडणूक आयोगाने तपास करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, कारमध्ये ईव्हीएम मशिन आढळल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर निवडणूक आयोगावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगावरही देशभरातून टिकेचा भडीमार होतं आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

१४ एप्रिल ही सार्वजनिक सुटी जाहीर; डॉ. आंबेडकरांच्या १३० व्या जयंतीनिमित्त केंद्र सरकारने केली घोषणा

मुलांना सांभाळा! लहान मुलांना का होतोय कोरोना? डॉ. तात्याराव लहानेंनी सांगितले खरे कारण

लग्नानंतर अवघ्या दीड महिन्यातच दिया मिर्झाने दिली गुडन्युज; बेबी बंपर फोटो व्हायरल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.