धक्कादायक! पोहण्यात पटाईत असूनही महाराष्ट्रातील नेव्ही ऑफिसर धबधब्यात गेला वाहून, शोधकार्य सुरू

तिरुवनंतरपुरम। केरळमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रातील एक नेव्ही ऑफिसर सहकाऱ्यांसोबत धबधब्यात गेला असता वाहून गेल्याची घटना घडलीय. व आता केरळमध्ये शोधकार्य सुरु असून सर्वांना धक्का बसला आहे.

नेव्ही ऑफिसर असून वाहून गेल्यानं अनेकांना विश्वास बसत नाहीय तर या घटनेनं सर्वत्र खळबळ उडाली आहे. अभिषेक असं या वाहून गेलेल्या नेव्ही ऑफिसरचं नाव आहे. अभिषेक हा 28 वर्षाचा तरुण नुकताच नेव्हीत दाखल झाला होता.

अभिषेक नेव्हीतील त्याच्या इतर सहकाऱ्यांसोबत केरळमधील मार्मला धबधब्याच्या पाण्यात पोहत होता. आठ जणांसोबत तो सध्या केरळला भेट देण्यासाठी आला होता. यावेळी सर्वजण एकत्रितपणे पोहत असताना अचानक अभिषेक पाण्याच्या झोतात वेगळ्या दिशेला खेचला गेला.

पाहता पाहता पाण्याचा प्रवाह वाढत गेला आणि पाण्याच्या वाढत्या वेगापुढे अभिषेकला पुन्हा काठ गाठणं शक्य होईना. तरीही अभिषेक प्रचंड प्रयत्न करत राहिला. अभिषेक पूर्ण ताकदीनिशी वरती येण्याचा प्रयत्न केला मात्र अखेर पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे तो तग धरू शकला नाही, असं त्याच्या सोबत असलेल्या साथीदारांनी सांगितलं.

अभिषेक वाहून गेल्यानंतर आता अभिषेकला शोधण्याचं काम सध्या युद्धपातळीवर सुरु आहे, मात्र अद्यापही अभिषेकचा काहीही ठाव ठिकाणा लागलेला नाही. अभिषेकच्या झालेल्या या घटनेनंतर आता नागरिकांनी पर्यटनस्थळी गेल्यावर खोल पाण्यात उतरू नये आणि स्वतःचा जीव धोक्यात घालू नये, अशी सूचना प्रशासनानं दिल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
काय सांगता! अभिनेत्री जान्हवी कपूर करणार लवकरच लग्न; असा असेल मुलगा
राज्य सरकारचा मोठा निर्णय! आजपासून नवा सातबारा, जमिनीच्या खोट्या नोंदी करता येणार नाही
राज कुंद्राच्या कंपनीत पुरुषांचं देखील शोषण होत; ‘या’ अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा
बलात्कार करणाऱ्या आरोपीशीच लग्न करायला निघाली तरुणी; आरोपीला मिळाली होती २० वर्षांची शिक्षा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.